---Advertisement---

अरर..! फाफ डू प्लेसिस १९९ धावांवर बाद; पाहा ‘अशी’ गेली विकेट

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 8:10 PM
---Advertisement---

सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेला ३९६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ६०० पेक्षा अधिक धावा करत मोठी आघाडी मिळवली आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचे मोठे योगदान राहिले. मात्र त्याचे द्विशतक थोडक्यात हुकले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात चौथ्या क्रमांकार फलंदाजीसाठी उतरलेल्या फाफ डू प्लेसिसने २७६ चेंडूंचा सामना करताना २४ चौकारांसह १९९ धावांची खेळी केली आहे. मात्र त्याचे पहिले कसोटी द्विशतक केवळ १ धावेने हुकले. पण १९९ ही त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ठरली आहे. तसेच हे त्याचे कसोटीतील १० वे शतक आहे.

सोमवारी(२८ डिसेंबर) तो १९९ धावांवर असताना डावातील १३८ वे षटकात वनिंदू हसरंगाची गोलंदाजी खेळताना झेलबाद झाला. त्याने या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड-ऑनला उभा असलेल्या श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने त्याला झेल घेतला. त्यामुळे डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

या डावात दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद ६२१ धावा केल्या असून २२५ धावांची आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडून डू प्लेसिस व्यतिरिक्त डिन एल्गारने ९५ धावा, एडेन मार्करमने ६८ धावा, तेंबा बाऊमा ७१ धावा आणि केशव महाराजने ७३ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून हसरंगाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर विश्वा फर्नांडोने ३ विकेट्स घेतल्या. दसुन शनकाने २ आणि लहिरु कुमाराने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणारी एलिसा पेरी म्हणाली, ‘इतरही उत्तम महिला टी20 खेळाडू आहेत, पण…’

नया है ये…! न्यूझीलंडच्या प्रेक्षकाने चक्क स्वतः बनवला पाकिस्तानी खेळाडूंच्या चुकांचा स्कोर बोर्ड

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---