इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत रविवारी (२६ सप्टेंबर) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला १७१ धावा करण्यात यश आले होते. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज फाफ डू प्लेसिस याने केलेल्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघ अखेरपर्यंत झुंज देतो हे या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. परिस्थिती कशीही असो या संघातील खेळाडू माघार घेत नसतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे फाफ डू प्लेसिस. झेल टिपताना गुडघा रक्तबंबाळ होऊनही फाफ संघासाठी मैदानावर उपस्थित राहिला. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या डावात तो फलंदाजी करण्यासाठी देखील आला होता.
https://twitter.com/RunMachine_18/status/1442081924160258054?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442081924160258054%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2021-faf-du-plessis-takes-a-brilliant-catch-by-morgan-while-his-knee-was-bleeding-see-video-3766428.html
तर झाले असे की, क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. इतकेच नव्हे, तर त्याच्या गुडघ्यातून रक्त देखील वाहू लागले होते. तरी देखील तो मैदानावर उपस्थित होते. त्यानंतर पहिल्या डावातील १० वे षटक टाकण्यासाठी जोश हेजलवूड गोलंदाजीला आला होता. याच षटकातील पहिलाच चेंडू ऑयन मॉर्गनने लाँगऑनच्या वरून ६ धावांसाठी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत अप्रतिम झेल टिपला. या कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच फाफचे संघावरील प्रेम आणि खेळण्याची जिद्द पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CUSj9FxJf17/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CUSPMmeF3s7/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/p/CUSHpT9PiZ9/?utm_medium=copy_link
EVERYTHING special here! 👌 👌@faf1307 doing the Faf du Plessis things 😎🆒 #VIVOIPL #CSKvKKR @ChennaiIPL
Watch 🎥👇https://t.co/LdOHFdtQ0F
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
Respect×100 for Faf du plessis 💛
.#fafduplessis #ChennaiSuperKings #whistlepodu pic.twitter.com/AHtSIcaNsH— SPREAD.DHONISM 🦁™ (@Spreaddhonism7) September 26, 2021
यापूर्वी देखील चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू शेन वॉटसन याने रक्तबंबाळ गुडघे असताना अंतिम सामन्यात फलंदाजी केली होती. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ८० धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात देखील फाफ डू प्लेसिसने धावांचा पाठलाग करताना ४३ धावांचे योगदान दिले. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार मारले होते.
कोलकाताविरुद्धचा हा सामना चेन्नईने २ विकेट्सने खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!