दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे पण, आता तो लवकरच पुनरागमन करू शकतो. त्यांनी स्वत: हे संकेत दिले आहेत. टी20 विश्वचषक 2024 पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे आणि ही स्पर्धा लक्षात घेऊन 39 वर्षीय खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका व्यवस्थापन यांच्यात नुकतीच चर्चा झाली.
फाफ डु प्लेसिस (Faf Du Plessis) याने 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा टी20 सामना खेळला होता, तर 2021 पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. परंतु, तो जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटचा सातत्यपूर्ण भाग आहे आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधारही आहे.
अलीकडेच, भारताविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना, दक्षिण आफ्रिकेचे मर्यादित षटकांचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी डू प्लेसिसच्या पुनरागमनाचे दरवाजे बंद नसल्याचे संकेत दिले होते. आता माजी कर्णधारही याबाबत बोलला आहे.
39 वर्षीय खेळाडूने अबूधाबी टी10 लीगमध्ये सांगितले की, त्याला आत्मविश्वास आहे की, तो दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करू शकतो आणि गेल्या काही वर्षांपासून तो याबद्दल बोलत आहे. डु प्लेसिसने सांगितले की, या विषयी त्यानी वॉल्टरशी चर्चा केली होती.
तो म्हणाला, मला विश्वास आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करू शकतो. गेल्या काही वर्षांपासून आपण याबद्दल बोलत आहोत. ते फक्त पुढच्या वर्षीच्या टी20 विश्वचषकासाठी आहे. याबाबत नवीन प्रशिक्षकाशींही मी बोललो आहे.
भारताविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी फाफ डू प्लेसिसला जागा मिळालेली नाही. अशा स्थितीत त्याच्या पुनरागमनासाठी समीकरण तयार झाल्यावर कोणती मालिका निवडली जाते हे पाहणे बाकी आहे. (Faf du Plessis hints at comeback to international cricket, eyeing 2024 T20 World Cup)
महत्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये वाद, व्हिडिओ आला समोर
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का