इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी जास्त दिवस उरले नाहीत. १९ सप्टेंबरपासून युएईत आयपीएल सामने खेळण्यासाठी सर्व फ्रंचायझी जोरदार तयारी करत आहेत. परंतु, आयपीएलची सुरुवात होण्यापुर्वी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला मोठा झटका बसला आहे. सीएसके संघातील स्टार फलंदाज फाफ डु प्लेसिस आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही. कारण, त्याची पत्नी गरोदर आहे आणि ती लवकरच तिच्या दूसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते.
एवढेच नव्हे तर, डु प्लेसिससोबत सीएसकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीही आयपीएलमध्ये उशीरा आगमन करु शकतो. सीएसके संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग, फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन हे २२ ऑगस्टपर्यंत युएईत पोहोचू शकतात. तर, इंग्लंडचा सॅम करन आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेडलवूड हे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर युएईला पोहोचतील. Faf Du Plesis And Lungi Ngidi Would Join Late In CSK Sqaud,
पण, १८ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारे ड्वेन ब्रावो, मिचेल सेंटनर आणि इमरान ताहीर यांच्या आगमनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. २१ किंवा २२ ऑगस्टला युएईला जाण्यापुर्वी सीएसके संघ त्यांच्या घरेलू मैदान, एमए चिदंबरम स्टेडियमवर संघातील भारतीय खेळाडूंसाठी ५ दिवसीय शिबिर लावण्याच्या तयारीत आहे. या सराव शिबिरात खेळाडू त्यांच्या फिटनेस आणि त्यांच्या फॉर्मवर काम करतील.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सीएसकेचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपथी बालाजी म्हणाले की, “आम्ही मार्चमध्ये जिथून परत गेलो होतोत. तिथून पुढे जाणे चालू ठेवू. आयपीएलमध्ये यश मिळवण्यासाठी सामूहिक प्रदर्शन करणे आवश्यक आहे. आमचा उद्देश एवढाच असेल की, सर्व खेळाडूंना एका संघाप्रमाणे एकत्रित करायचे. त्यासाठी आम्ही तयारीला लागणे गरजेचे आहे. पण, आयपीएलच्या तयारीसाठी प्रत्येक खेळाडूचे वेगळे रुटीन आणि वेगळा फॉर्म्यूला असेल. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या फिटनेसला समजण्यात आणि सामूहिक खेळ सुरु करण्यापुर्वी त्यांची लय शोधण्यात मदत होईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ धोनीने सांगितल्यामुळे ‘या’ क्रिकेटरने खेळला होता २०११ सालचा विश्वचषक
वडील ख्रिस ब्रॉड यांनी शिक्षा सुनावल्याबद्दल स्टुअर्ट ब्रॉड म्हणतोय, आता ते…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज