---Advertisement---

याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा

Faf-Du-Plessis-Record
---Advertisement---

सातत्यपूर्ण कामगिरी काय असते, हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस रविवारी (दि. 14 मे) याने दाखवून दिले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअम येथे राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023च्या 60व्या सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात फाफने तडाखेबंद अर्धशतक झळकावत खास विक्रम नावावर केले.

नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी डावाची सुरुवात करण्यासाठी फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) मैदानावर उतरला. यावेळी त्याने आधी 24 धावा पूर्ण करत हंगामातील 600 धावा पूर्ण केल्या. त्याचसोबत त्याने आयपीएल कारकीर्दीतील 4000 धावांचा टप्पादेखील पूर्ण केला. याव्यतिरिक्त त्याने पुढे अर्धशतकही साकारले. फाफने 44 चेंडूंचा सामना करताना 55 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 3 चौकारही मारले. हे त्याचे हंगामातील सातवे अर्धशतक ठरले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. आतापर्यंत आयपीएल 2023 हंगामात फाफशिवाय कुठल्याच खेळाडूला 7 अर्धशतके करता आली नाहीयेत.

फाफची सातत्यपूर्ण खेळी
फाफ डू प्लेसिसची सातत्यपूर्ण खेळी दाखवून देते की, तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गुणतालिकेत सातव्या स्थानी असलेल्या आरसीबी (RCB) संघाचा कर्णधार फाफ या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. त्याने 55 धावा करताच तो या हंगामात 12 सामने खेळून 57.36च्या सरासरीने सर्वाधिक 631 धावा केल्या आहेत.

या धावा करताना त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 84 इतकी आहे. ही धावसंख्या त्याने पंजाबविरुद्धच्या आपल्या सहाव्या सामन्यात केली होती. फाफच्या हंगामातील खेळलेल्या 12 सामन्यांचा आढावा घ्यायचा झाला, तर त्याने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 43 चेंडूत 73 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोलकाताविरुद्ध 12 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात लखनऊविरुद्ध 46 चेंडूत नाबाद 79 धावा, चौथ्या सामन्यात दिल्लीविरुद्ध 16 चेंडूत 22 धावा, पाचव्या सामन्यात चेन्नईविरुद्ध 33 चेंडूत 62 धावा, सातव्या सामन्यात राजस्थानविरुद्ध 39 चेंडूत 62 धावा, आठव्या सामन्यात कोलकाताविरुद्ध 7 चेंडूत 17 धावा, नवव्या सामन्यात पुन्हा लखनऊविरुद्ध 40 चेंडूत 44 धावा, दहाव्या सामन्यात दिल्लीविरुद्ध 32 चेंडूत 45 धावा, 11व्या सामन्यात मुंबईविरुद्ध 41 चेंडूत 65 धावा आणि आता 12व्या सामन्यात पुन्हा राजस्थानविरुद्ध 44 चेंडूत 55 धावा केल्या.

बेंगलोरने चोपल्या 171 धावा
या सामन्यात बेंगलोरने फाफ (55) आणि आणि ग्लेन मॅक्सवेल (54) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 171 धावा चोपल्या. तसेच, राजस्थानला 172 धावांचे आव्हान दिले. आता या धावांचा बचाव करणे बेंगलोरला शक्य जाते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Faf du Plessis One of the consistent Batter of RCB this season hit 7th fifty of IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
बेंगलोरसाठी फाफ बनला ‘रनमशीन’, 24 धावांचा टप्पा पार करताच नावावर केला IPL 2023मधील खास विक्रम
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा जिंकताच विराटची राहुल गांधींसाठी खास पोस्ट? सर्वत्र रंगली एकच चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---