---Advertisement---

सर व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत या पाकिस्तानी फलंदाजाने रचला विश्वविक्रम

On: रविवार, जुलै 22, 2018 2:22 PM
---Advertisement---

रविवारी (22जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानने खास विश्वविक्रम रचला आहे.

त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला असुन तो वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने हा टप्पा त्याच्या 18 व्या डावात पूर्ण केला.

या सामन्याआधी त्याला वनडेत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 20 धावांची गरज होती. या 1000 धावा त्याने रविवारी तेंदाई छताराने टाकलेल्या चेंडूवर चौकार ठोकत पूर्ण केल्या. तसेच या सामन्यात त्याने त्याचे सहावे अर्धशतक पूर्ण केले आहे.

या आधी हा विक्रम विभागून सर व्हिव रिचर्ड्स, केविन पिटरसन,जोनाथन ट्रॉट, क्विंटन डी कॉक आणि बाबर आझम या  5 खेळाडूंच्या नावावर होता.  त्यांनी वनडेमध्ये 21 डावात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

जमानने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तर या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळताना त्याने पहिले शतक झळकावले होते.

वनडेत द्विशतक करणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज:

जमानने शुक्रवारी (20 जुलै) झिम्बाब्वे विरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात नाबाद 210 धावा धावा करत वनडेत द्विशतक करणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज होण्याचा मान मिळवला होता.

याबरोबरच वनडेत द्विशतक करणारा तो जगातील एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टीन गप्टील आणि ख्रिस गेल यांनी हा कारनामा केला आहे.

जमानने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत तीन शतके आणि सहा अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

संघ निवडीसाठी यो-यो हा एकमेव निकष असू शकत नाही -सचिन तेंडुलकर

या गोष्टीमुळे राहुल द्रविड झाला आनंदीत

मुथय्या मुरलीधरनने आजच्याच दिवशी २०१० साली, क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment