---Advertisement---

द्विशतक पूर्ण नाही झाले, पण फखर जमानने सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 2:08 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी (४ एप्रिल ) पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाने १७ धावांनी विजय मिळवला. यासोबतच दक्षिण आफ्रिकन संघाने मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. या सामन्यात दुहेरी शतक करण्यापासून ७ धावांनी वंचित राहिलेल्या फखर जमानने विराट कोहलीच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने केलेला १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने फलंदाजीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे. तसेच त्याने विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी (५ नोव्हेंबर) २००९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात १७५ धावांची खेळी केली होती. तरीदेखील भारतीय संघाला हा सामना ३ धावांनी गमवावा लागला होता.

त्यावेळी सचिनच्या नावे वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावा करूनसुद्धा सामना गमावण्याचा विक्रम झाला होता. हा विक्रम तब्बल १२ वर्षानंतर फखर जमानने मोडीत काढला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९३ धावांची खेळी करणारा फखर आता धावांचा पाठलाग करताना पराभूत झालेल्या संघाकडून सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

फकर जामानने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३४१ धावांचा पाठलाग करताना एकहाती झुंज देत १५५ चेंडूमध्ये १९३ धावांची खेळी केली होती. दुहेरी शतक करण्यासाठी ७ धावांची गरज असताना तो धावचीत झाला. यासोबतच पाकिस्तान संघाने हा सामना १७ धावांनी गमावला.

महत्त्वाच्या बातम्या –

देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत हे ‘३’ फलंदाज आरसीबीकडून पाडू शकतात चौकार आणि षटकारांचा पाऊस

आयपीएल इतिहासात झाली आहे ‘या’ लाजिरवाण्या विक्रमांचीही नोंद; दिग्गज खेळाडूंचाही समावेश

मोईन अलीने दारुच्या कंपनीचा लोगो जर्सीवरुन हटवण्याची केली होती मागणी? चेन्नईचे सीइओ यांनी दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---