---Advertisement---

अंतिम संस्कारात कुटुंब अन् मित्रांकडून वॉर्नला शेवटचा निरोप; जवळच्या मित्राच्या आठवणीत मॅकग्राला अश्रू अनावर

On: रविवार, मार्च 20, 2022 3:52 PM
Shane-Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ मार्च रोजी थायलंड येथे अखेरचा श्वास घेतला होता. यानंतर एका आठवड्याने त्याचे पार्थिव शरीर थायलंडच्या बँकॉकहून मेलबर्न येथे आणण्यात आले होते. त्याच्या निधनाने अवघ्या क्रिकेट विश्वाला धक्का बसला. अजूनही चाहते आणि दिग्गज क्रिकेटपटू या धक्क्यातून सावरले नाहीयेत. अशातच शेन वॉर्नचे कुटुंब आणि त्याचे मित्र त्याला अंतिम निरोप देण्यासाठी त्याच्या मेलबर्न येथील घरी खासगी अंतिम संस्कारात सामी झाले.

शेन वॉर्नला (Shane Warne) शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेल्या ८० व्यक्तींमध्ये दिग्गजाचे आई-वडील आणि मित्रही सामील झाले होते. त्याच्या मित्रांमध्ये निवृत्ती घेतलेला कसोटी कर्णधार मार्क टेलर, तसेच ऍलेन बॉर्डर, ग्लेन मॅकग्रा आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांचाही समावेश होता.

https://twitter.com/VibhuBhola/status/1505457997971357696

यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (Shane Warne) वॉर्नला अंतिम निरोप देताना स्वत:ला सावरू शकला नाही. तो इतका भावूक झाला की, त्याला अश्रू अनावर झाले. मॅकग्राने वॉर्नसोबत अनेक वर्षे क्रिकेट खेळले होते. तसेच, दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही होते.

https://twitter.com/Malikfassi47/status/1505453542626107392

वॉर्नच्या अंतिम संस्काराचा हा कार्यक्रम सेंट किल्दा फुटबॉल क्लबमध्ये झाला. या कार्यक्रमात सामील होणाऱ्या सर्व लोकांना संत स्कार्फ देण्यात आला. शेवटी कुटुंबात आणि खास मित्रांनी अंतिम प्रक्रिया पूर्ण केली. शवपेटी दफन करताना ‘फिक्स यू’ हे गाणे गायले होते.

ग्लेन मॅकग्रा म्हणाला की, “शेन वॉर्नची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तो जिथे गेला तिथे त्याने आपली छाप सोडली. तो कधीच एकाकीपणासारखा किंवा साधूसारखा नव्हता, परंतु तो आपल्या आयुष्यात नेहमी मित्रांना खूप महत्त्व द्यायचा.”

वॉर्नची गणना क्रिकेट इतिहासातील अव्वल खेळाडूंमध्ये होते. वॉर्न आपल्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी थायलंडमध्ये गेला होता. मात्र, तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या ‘ऑटोप्सी’ तपासात सांगण्यात आले की, ५२ वर्षीय वॉर्नचे निधन कदाचित हृदयाचा झटका आल्याने झाला होता.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर ३० मार्च रोजी राजकीय सन्मानासह त्याला शेवटचा निरोप दिला जाईल. यामध्ये सामान्य नागरिकांनाही येण्याची परवानगी असेल. मैदानाच्या एका स्टँडला वॉर्नच्या सन्मानार्थ त्याचे नावही देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडने चक्क ‘नंबर वन’ गोलंदाजाला महत्त्वाच्या मालिकेतून वगळले, मग गोलंदाजानेही व्यक्त केला ‘हा’ मानस

आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर

Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---