---Advertisement---

ब्रेकिंग! फुटबॉल विश्वातील ‘सुपर एजंट’ने घेतला जगाचा निरोप, प्रसिद्ध खेळाडूंचे केले होते प्रतिनिधित्व

On: शनिवार, एप्रिल 30, 2022 8:13 PM
Mino-Railo
---Advertisement---

फुटबॉल विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल एजंटपैकी एक असलेल्या मिनो रायोला यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना ‘सुपर एजंट’ म्हणूनही ओळखले जायचे. त्याच्या निधनामुळे फुटबॉल विश्वावर शोककळा पसरला असून अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

प्रसिद्ध फुटबॉल पत्रकार फॅब्रिझिओ रोमानोने (Fabrizio Romano) ट्वीट करत मिनो रायोलाला (Mino Raiola) श्रद्धांजली वाहिली. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “भयानक बातमी. फुटबॉल एजंट मिनो रायोला यांचे आजारपणाने निधन झाले आहे, तो अनेक महिन्यांपासून आजारी होता, तो ५४ वर्षांचा होता. रायोला हा झ्लाटन इब्राहिमोविक, पॉल पोग्बा, एर्लिंग हॅलँड, पावेल नेदवेद आणि इतर अनेक फुटबॉल स्टार्सचा एजंट होता.”

रायोलाने पॉल पोग्बा आणि झ्लाटन इब्राहिमोविच या खेळाडूंचे प्रतिनिधित्व केले होते.  मॅथिज डी लिग्ट आणि जियानलुइगी डोनारुम्मा या खेळातील काही मोठ्या नावांचे प्रतिनिधित्व केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

केरला ब्लास्टर्सची विजयी घोडदौड रोखण्यास चेन्नईयन सज्ज; मुंबई, आरएफवायसी पहिल्या विजयाच्या शोधात

मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, मुलाचे झाले निधन; वाचा सविस्तर

स्पोर्ट्स रिलायन्स फाउंडेशन डेव्हलपमेंट लीगचा पहिलावहिला हंगाम १५ एप्रिलपासून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---