---Advertisement---

लवकरच मॅराडोनाची जादू झळकणार मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉनने लॉन्च केला वेबसिरीजचा टिझर

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 10:39 PM
---Advertisement---

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांनी फुटबॉल विश्वात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. २५ डिसेंबर २०२० रोजी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.आता हा फुटबॉलपटू मैदानात खेळत नसला तरी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्याचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. याचा टिझर आता लाँच करण्यात आला आहे.

डिएगो मॅराडोनाच्या आयुष्यावर लवकरच ॲमेझॉनवर ‘मॅराडोना, ब्लेस्ड ड्रीम’ ही वेब सीरिज लाँच करण्यात येणार आहे. याचा ३९ सेकंदाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. ज्यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. १९८२ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने हाताने गोल केला होता. तो गोल ‘ हॅण्ड ऑफ गॉड ‘ नावाने ओळखला जातो. झाले असे होते की, मॅराडोनाच्या हाताने चुकुन बॉल गोल पोस्ट मध्ये गेला होता. जे रेफरीच्या नजरेत आले नव्हते. त्यानंतर मॅराडोनाने याला हॅण्ड ऑफ गॉड म्हणून आपली चूक लपवली होती.

मॅराडोनाचा जन्म १९६० मध्ये अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्स मध्ये झाला होता. त्याला लहानपणापासुनच फुटबॉलपटू व्हायचे होते. या टीजर मध्ये ही दाखवण्यात आले आहे की, तो तरुण असताना किती उत्साही आणि तंदुरुस्त होता. त्याची मैदानावरील कामगिरी पाहून चाहते आश्चर्यचकित होत असत. त्याने आपल्या कारकीर्दीत अर्जेंटिना फुटबॉल संघाला पहिल्या स्थानी आणून ठेवले होते.

त्याचे फुटबॉल बद्दल इतके प्रेम होते की, त्याने निवृत्ती घेतल्यानंतरही तो, जेव्हा टिव्ही वर सामना पाहत असे तेव्हा कोणाशी ही बोलत नसे. त्याचे पूर्ण लक्ष सामन्यातच असायचे. त्याचे निधन होण्यापूर्वी त्याची ब्रेन सर्जरी झाली होती. परंतु घरी असताना त्याचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या वेब सिरीज मध्ये अश्या खूप गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. ज्या जास्त लोकांना माहीत नाहीये. मात्र ही वेब सिरीज केव्हा रिलीज होणार याबाबत ॲमेझॉनने कुठल्याही बाबतची माहिती दिली नाहीये.

महत्वाच्या बातम्या:

हिट है बॉस! रोहितने लाँग ऑफला एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, पाहा झक्कास व्हिडिओ

वा मिश्राजी वा! केली मुंबईविरूद्ध कोणालाही न जमलेली कामगिरी

व्हिडिओ : जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची धोनीलाही पडली भुरळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---