---Advertisement---

IND vs ENG: टीम इंडियाची चिंता वाढली, एजबेस्टनवर प्रसिद्ध कृष्णाची लाजिरवाणी कामगिरी

On: शुक्रवार, जुलै 4, 2025 9:11 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक (Jemi Smith & Harry Brook) यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच मोहम्मद सिराजने सलग दोन चेंडूंवर 2 विकेट घेतल्या, पण त्यानंतर स्मिथ आणि ब्रूक यांनी मिळून विक्रमी भागीदारी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीचा सर्वात जास्त फटका प्रसिद्ध कृष्णाला (Prasiddh Krishna) बसला. त्याने या सामन्यात 6 च्या वरच्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि आपल्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला.

कसोटी क्रिकेटच्या (Test Cricket) इतिहासात किमान 500 चेंडू टाकलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक खराब इकॉनॉमी असलेला गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णाचं नाव आता सर्वांत वर गेलं आहे. 29 वर्षांच्या प्रसिद्ध कृष्णाने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 588 चेंडू टाकून 518 धावा दिल्या आहेत आणि त्याची इकॉनॉमी 5.28 इतकी राहिली आहे. ही लाल चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वांत वाईट कामगिरी मानली जाते. या सामन्यात त्याने सुरुवातीच्या 8 षटकांत 7.60 च्या इकॉनॉमीने मोठ्या प्रमाणात धावा गमावल्या. या मालिकेत आतापर्यंत त्याने 6.53 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

तिसऱ्या दिवशी त्याने पहिल षटक टाकल आणि फक्त 5 षटकांत 50 धावा लुटवल्या. 2006 नंतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात महागडा स्पेल ठरला आहे.

हेडिंग्ले कसोटी क्रिकेटमध्ये एजबेस्टनमध्येही प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी फारच निराशाजनक दिसली. सध्या त्याच्या गोलंदाजीत गती जाणवत नाही. पहिल्या सामन्यात ब्रूक आणि स्मिथची विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतली होती, पण या सामन्यात तो योग्य कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---