इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला जगातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग मानली जाते. या स्पर्धेत फक्त मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचीच चर्चा नसते तर मैदानाबाहेर असलेले समालोचक ही तितक्याच चर्चेत असतात. गेल्या काहीवर्षात मयंती लँगरने देखील आपल्या समालोचनाच्या कौशल्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. काही वर्षांपूर्वी तिला सोशल मीडियावर एका चाहत्याने एक खास मागणी केली होती. ज्यावर मयंतीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एका युजरने लिहिले होते की, “जेव्हा मी तुम्हाला पाहतो, तेव्हा मला आयपीएल पाहण्यात हरकत नसते. तुम्ही एक क्लास आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाचे एक उदाहरण आहात. माझी अशी इच्छा आहे की, मी इतकं प्रभावी असावं की मी तुमच्यासोबत रात्रीचं जेवण करण्यासाठी जावं.आपण किती सुंदर आहात हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” यासोबतच युजरने हार्टचा इमोजी देखील शेअर केला होता.
या प्रतिक्रियेवर भन्नाट प्रत्युत्तर देत मयंती लँगर तर जाण्यासाठी तयार झाली होती. परंतु तिने काही नियम व अटी ठेवल्या होत्या. तिने त्याला प्रतिसाद देत लिहिले की, “मला आणि माझ्या पतीला तुमच्यासोबत जेवायला जायला नक्की आवडेल,धन्यवाद!!” यासोबतच तिने सौम्य हसतानाचा ईमोजी शेअर केला होता.
Thank you! My husband and I would love to join you 😊 https://t.co/EI9jDGj6Rp
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) April 9, 2018
मयंती लँगरने युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. आयपीएल २०२० दरम्यान तिने बाळाला जन्म दिला होता. तसेच तिच्या अनुपस्थित अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली होती. ती सध्या तिच्या मुलाबरोबरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.
महत्त्वाच्या बातम्या –
कुलदीपने गेस्ट हाऊसमध्ये घेतला कोरोना लसीचा पहिला डोस? कानपूर प्रशानसाने दिले चौकशीचे आदेश
“हा तुमच्या काकाचा संघ नाही की, तुम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाजी कराल”