सध्या पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी २० सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने जोरदार विजय मिळवत मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तान संघातील गोलंदाज शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शादाब खान चांगली गोलंदाजी करून चर्चेत आले तर, बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिज़ुर रहमान देखील एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे.
क्रिकेटपटूला समर्थन करणारे असंख्य चाहते असतात. तसेच अनेक चाहते त्या क्रिकेटपटूवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठलीही मर्यादा ओलांडतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहता सेक्यूरीटीगार्ड पासून स्वतः चा बचाव करत मैदानात प्रवेश करतो आणि मुस्तफिज़ुर रहमानचे चरण स्पर्श करतो.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मैदानात प्रवेश करण्यापूर्वी तो चाहता सेक्युरीटी गार्डला खूप पळवतो आणि शेवटी त्यांना मागे सोडून सीमारेषा ओलांडून मैदानात प्रवेश करतो. त्यानंतर तो मुस्तफिजूरकडे धाव घेतो आणि त्याचे चरण स्पर्श करतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून, हे तर स्पष्ट झाले की, फक्त भारतातच नव्हे तर बांगलादेशमध्ये ही क्रिकेटपटूला देव मानले जाते. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ४० तर आफिफ हुसेनने २० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाला २० षटकांअखेर ७ बाद १०८ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून फखर जमानने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली, तर मोहम्मद रिजवानने ३९ धावांचे योगदान देत पाकिस्तान संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतरही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीची सतावतेय चिंता