भारतीय संघाचा उगवता तारा ऋतुराज गायकवाडनं अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र त्याला आतापासूनच भविष्यातील सुपरस्टार मानलं जात आहे. याची प्रचिती अनंतपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान आली.
दुलीप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड इंडिया सी टीमचा कर्णधार आहे. इंडिया डी संघाविरुद्धच्या सामन्यात एक अनोखी घटना घडली, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सामन्यादरम्यान एक चाहता मैदानात घुसला आणि सरळ ऋतुराज गायकवाडकडे धावत आला. जवळ पोहचताच त्यानं ऋतुराजचे पाय पकडले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही हे फोटो येथे पाहू शकता.
A fan entered into the stadium and touched Ruturaj Gaikwad’s feet..
Ruturaj earned fans love even before a solid international career.. he will emerge as the next biggest cricketing icon in the nation!@Ruutu1331 #MassCraze pic.twitter.com/E8Usi1m5KT
— 𝐖𝐡𝐢𝐬𝐭𝐥𝐞𝐩𝐨𝐝𝐮 𝐅𝐂 (@CSK_Zealots) September 6, 2024
गेल्या वर्षी झालेल्या आशियाई खेळांमध्ये ऋतुराज गायकवाड भारताच्या युवा संघाचा कर्णधार होता. या संघानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर आयपीएल 2024 पूर्वी ऋतुराजला चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व मिळालं. त्यानं दिग्गज महेंद्रसिंह धोनीकडून ही जबाबदारी घेतली. त्यानंतर आता त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला इंडिया सी संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय.
आयपीएलमध्ये चेन्नईसाठी सलामीला येवून धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराजनं भारतीय संघासाठी आतापर्यंत 6 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली. त्यानं आयपीएलच्या 66 सामन्यांमध्ये 41.75 च्या सरासरीनं 2380 धावा ठोकल्या. यामध्ये 2 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात मात्र ऋतुराज फारशी कमाल दाखवू शकला नाही. तो 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षित राणानं त्याची विकेट घेतली. आता सामन्याच्या दुसऱ्या डावात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
हेही वाचा –
आयपीएलमधील या 3 संघांच्या रडारवर शतकवीर मुशीर खान, लावू शकतात मोठी बोली
भारतात पोहोचताच न्यूझीलंडची मोठी खेळी; टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला प्रशिक्षक बनवले
‘राहुल भाई विनम्र होता, पण गौतम खूप…’, पाहा मुख्य प्रशिक्षकांच्या कोचिंगमधील फरक