चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. तो जिथेही जातो, तिथे त्याचे चाहते दिसून येत असतात. तसेच सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातही धोनीला स्टेडियममधून चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिसून आला. मात्र, याचदरम्यान शुक्रवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील सामन्यादरम्यान एक चाहता सुरक्षा तोडत मैदानात घुसल्याचे दिसून आले.
शुक्रवारी (२१ मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई आणि राजस्थान संघात (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) सामना झाला. याच सामन्यादरम्यान चेन्नईकडून धोनी (MS Dhoni) आणि मोईन अली (Moeen Ali) फलंदाजी करत असताना चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घातलेला एक चाहता अचानक मैदानातून धोनीच्या दिशेने पळत आला(fan enters playing area).
पण, त्याचवेळी मैदानावरील पंच ख्रिस गॅफनी (Chris Gaffaney) यांनी त्याला आडवत धोनीजवळ जाऊ दिले नाही. कारण, सध्या सर्व खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. जेव्हा तो चाहता मैदानात आला होता, तेव्हा धोनीने त्याला परत जाण्यासाठी सांगत होता. त्याठिकाणी एमएस धोनीबरोबर राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील होता. नंतर सुरक्षा रक्षक मैदानात आले आणि त्या चाहत्याला बाहेर घेऊन गेले.
चाहता धोनीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात घुसण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही असे अनेकदा झाले आहे. तसेच केवळ धोनीबाबतच नाही, तर आयपीएल २०२२ हंगामादरम्यानच रोहित शर्माला भेटण्यासाठीही एका चाहत्याने मैदानात अशीच धाव घेतली होती.
View this post on Instagram
चेन्नईचा शेवटच्या सामन्यात पराभव
या सामन्यात चेन्नईने मोईन अलीच्या ९३ धावांच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५० धावा केल्या. मोईन अलीव्यतिरिक्त अन्य कोणत्या फलंदाजाला फार काही करता आले नाही. धोनीनेही २८ चेंडूत २६ धावांची धीमी खेळी केली. राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग राजस्थान रॉयल्सने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. राजस्थानकडून यशस्वी जैयस्वालने अर्धशतक केले; त्याने ५९ धावांची खेळी केली. तसेच आर अश्विनने नाबाद ४० धावा केल्या. चेन्नईकडून प्रशांत सोळंकीने २ विकेट्स घेतल्या.
चेन्नईचा हा आयपीएल २०२२ हंगामातील अखेरचा सामना होता. कारण त्यांचे प्लेऑफमधील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते. त्यामुळे यावर्षी धोनी चाहत्यांना अखेरच्यावेळी मैदानात दिसला. असे असले तरी शुक्रवारी सामन्यापूर्वी धोनीने तो पुढीलवर्षी देखील चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पण, त्याचवेळी मैदानावरील पंच ख्रिस गॅफनी (Chris Gaffaney) यांनी त्याला आडवत धोनीजवळ जाऊ दिले नाही. कारण, सध्या सर्व खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. जेव्हा तो चाहता मैदानात आला होता, तेव्हा धोनीने त्याला परत जाण्यासाठी सांगत होता. त्याठिकाणी एमएस धोनीबरोबर राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील होता. नंतर सुरक्षा रक्षक मैदानात आले आणि त्या चाहत्याला बाहेर घेऊन गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी पुढल्यावर्षी खेळतोय, हे समजताच गावसकरांनी दिली कोट्यवधी थालाप्रेमींच्या मनातली प्रतिक्रिया
सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला