वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अखेरचा दिवस आज साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी देखील खेळ अतिशय रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही संघांकडून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ रसिकांना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मैदानात केवळ चार हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी असली तरी जेवढे उपस्थित आहे, ते खेळाचा आनंद लुटतांना दिसून येत आहेत. मात्र सामन्याच्या बदलत्या स्थितीनुसार त्यांची मनस्थिती देखील बदलते आहे. हेच दर्शवणारा एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे.
चाहत्यांचे भन्नाट हावभाव
त्याचे झाले असे की, पहिल्या सत्रात भारतीय संघाने २ बाद ६४ धावांवर आपला डाव पुढे सुरु केला. सुरुवात त्यांनी दमदार केली होती. मात्र त्यानंतर कायले जेमिसनने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत दोघांनाही तंबूत धाडले. यानंतर भारतीय संघ चांगलाच संकटात सापडला होता. पण उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रिषभ पंतसह भागीदारी रचायला सुरुवात केली.
हे दोघेही अडखळत का होईना, पण खेळपट्टीवर स्थिरावताना दिसत होते. त्यामुळे कोहली आणि पुजारा यांच्या विकेटनंतर निर्माण झालेला दबाव काहीसा कमी झाला. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लेगसाईडला फटका मारण्याच्या नादात रहाणे बाद झाला. हे पाहून मैदानातील प्रेक्षक निराश झाले. हाच क्षण कॅमेरामनने अचूक टिपला. रहाणे बाद होण्या पूर्वीच्या चेंडूआधी काही प्रेक्षक कॅमेराकडे बघून सेलिब्रेशन करत होते. मात्र त्यात रहाणे बाद झाल्याचे दिसताच त्यांना आपल्या चेहर्यावरील निराशा लपवता आली नाही.
पाहा व्हिडिओ-
Aur Bhai Aa Gaya Swaad 😂#INDvsNZ #WTC2021Final #WTC21 #WTCFinal pic.twitter.com/9xBvXOppmU
— َ (@52off89) June 23, 2021
https://twitter.com/OneCricketApp/status/1407666261132144640?s=08
https://twitter.com/sunilmeel811/status/1407666115111649283?s=08
पहिले सत्र न्यूझीलंडच्या नावे
दरम्यान, या अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवसाचे पहिले सत्र न्यूझीलंडच्या संघाने आपल्या नावे केले. या सत्रात भारतीय संघाने केवळ ६६ धावा केल्या. तर कोहली, रहाणे आणि पुजारा अशा तीन महत्वाच्या विकेट गमावल्या. मात्र सत्राच्या शेवटी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाने आणखी पडझड होणार नाही, याची काळजी घेतली. न्यूझीलंडकडून या सत्रात कायले जेमिसनने २ आणि ट्रेंट बोल्टने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या:
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; या दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर