इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन भारतीय संघाबद्दल नेहमीच वादग्रस्त प्रतिक्रिया देत असतो. याच कारणामुळे तो नेहमी भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर असतो. अनेकदा हे वाद टोकाला देखील जातात. मात्र, आता वॉनने भारतीय चाहत्यांनी तयार केलेल्या मीम्सचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी वॉनने केलेले ट्विट
एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर वॉनने ट्विटरवर लिहिले होते की, हवामानाने भारतीय संघाला वाचवले. या ट्विटनंतर इंग्लंडच्या या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले.
या ट्विटनंतर एका भारतीय चाहत्याने मीम बनवत मायकल वॉनला ट्रोल केले. एका ट्विटर वापरकर्त्याने मीम बनवत वॉन हा इंग्लंडमधील हिरव्या खेळपट्ट्यांवर खत टाकताना दाखवला आहे. त्याला कॅप्शन देताना या वापरकर्त्याने ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी वॉन’ असे लिहिले.
विशेष म्हणजे वॉनला हा मीम आवडला व त्याने ते ट्विट रिट्विट करत ‘हाहाहा… आवडले हे’ असे उत्तर दिले. वॉनच्या या ट्विटखाली अन्य एका चाहत्याने टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या रामायण मालिकेतील भगवान हनुमानाच्या तोंडी असलेले वाक्य मीम म्हणून वापरले.
Ha ha .. love it … https://t.co/hG7SslzG4q
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 20, 2021
भारतीय चाहत्यांशी यापूर्वी देखील झाला सामना
इंग्लंडच्या संघाने जेव्हा भारत दौरा केला होता, तेव्हा वॉनने भारतीय खेळपट्ट्यांविषयी चूकीची वक्तव्ये केली होती. वॉन समालोचन करताना देखील भारतीय खेळाडू व संघाविषयी चुकीच्या प्रतिक्रिया देत असतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावर पावसाचा प्रभाव
प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत पावसाचा प्रभाव राहिला आहे. १८ जूनपासून सुरू होणारा हा सामना पावसामुळे १९ जून रोजी सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ६५ षटकांचा खेळ झाला. तर, तिसऱ्या दिवशीही अंधुक प्रकाशामुळे खेळ वेळेपूर्वीच थांबवला गेला. चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अशोभनीय! विराट, रोहितला बाद केलेल्या जेमिसनवर भारतीय चाहत्यांची पातळी सोडून टीका
WTC फायनलमधील एकाच घटनेसाठीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे समोरासमोर आले रोहित आणि विराटचे चाहते