---Advertisement---

प्लेइंग इलेव्हनमधून कार्तिकचा पत्ता कट होणार? सातत्याने अपयशी ठरल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट

On: शुक्रवार, एप्रिल 28, 2023 3:17 PM
Dinesh Karthik
---Advertisement---

बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. IPL मधील 36 वा सामन्यामध्ये आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली याच्याकडे होते. विराटने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या केकेआरने या संधीचे सोने करत 201 धावांचे आव्हान आरसीबीपुढे दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, विराटव्यतिरिक्त एकही फलंदाज आरसीबीसाठी अपेक्षित खेळी करू शकला नाही. केकेआरने या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. फिनीशर दिनेश कार्तिक पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याने सोशल मीडियावरून त्याच्यावर जोरदार टीका होत आहेत.

केकेआरकडून मिळालेल्या 201 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) मैदानात आले. विराटने अवघ्या  37 चेंडूत 54 धावा करत संघाला चांगली सुरुवात दिली. पण ड प्लेसिस मात्र 7 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. तसेच शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महीपाल लोमरोर यांनी अनुक्रमे 2, 5 आणि 34 धावांवर विकेट गमावल्या. आरसीबीची धावसंख्या 4 बाद 113 धावा असताना फिनीशर दिनेश कार्तिक मैदानात आला.

https://twitter.com/InanGma/status/1651284487135690765?s=20

दिनेश कार्तिक चागंली कामगिरी करून संघाला विजयाकडे घेऊन जाईल, अशी आशा होती. पण दिनेश विशेष कामगिरी करू शकला नाही. पण आरसीबीला मोठी खेळी हवी असताना कार्तिकने 18 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. चालू आयपीएल हंगामातील कार्तिकचे प्रदर्शन पाहिले, तर त्याचा फॉर्म खराब पाहायला मिळाला आहे. मागच्या हंगामात कार्तिकने आरसीबीसाठी धमाकेदार प्रदर्शन केले होते आणि त्याच जोरावर भारतीय संघात स्थान देखील मिळवले होते. मात्र, चालू हंगामात त्याच्याकडून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. सोशल मीडियावर कार्तिकला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवण्याची मागणी नेटकरी करू लागले आहेत. कार्तिकने चालू हंगामातील सुरुवातीच्या 8 सामन्यांमध्ये 11.85 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 83 धावा केल्या आहेत. नेटकरी ट्वीटवर कार्तिकच्या खराब प्रदर्शनामुळे संताप व्यक्त करत आहेत. (Fans are criticizing Dinesh Karthik’s poor form on social media)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Impact Player नियमाबद्दल गावसकर नाराज; फलंदाजांना लाख मोलाचा सल्ला देत म्हणाले, ‘नो फिल्डिंग…’  
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---