---Advertisement---

मानलं रे भावा ! ऋतुराजनं केलं ट्वीटर जाम, भीमपराक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

On: सोमवार, नोव्हेंबर 28, 2022 4:21 PM
Ruturaj Gaikwad 7 sixes
---Advertisement---

सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याने धुमधडाका केला. सोमवारी (दि. 28 नोव्हेंबर) महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या संघात विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात ऋतुराजने झंझावती द्विशतक झळकावले. त्याने 159 चेंडूत 10 चौकार आणि 16 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 220 धावा केल्या. मात्र, या भीमपराक्रमाबरोबरच त्याने आणखी एक विक्रम केला. त्याने एकाच षटकात 7 षटकार मारण्याची किमया करुण दाखवली. त्याच्या या 7 षटकारांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जात आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने उत्तरप्रदेश विरुद्धच्या सामन्यात विश्वविक्रम केला. संपूर्ण क्रिकेट इतिहासात एकाच षटकात 7 षटकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज ठरला. त्याचा या षटकारांचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश समोरासमोर आले. हा सामना गुजरातमधाल नरेंद्र मोदी स्टेडीयम, मोटेरा येथे खेळवण्यात आला. या सामन्यात उत्तरप्रदेशचा डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू शिवा सिंग याला एकाच षटकात सलग 7 षटकार मारले. त्यानंतर क्रिकेट रसिकांनी ऋतुराजला चांगलच डोक्यावर घतले आहे. ट्वीटरवर तर ऋतुराजवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

https://twitter.com/Vineeth_777/status/1597131442034593792?s=20&t=CWI_AqQda3ErlvCI9UNrXQ

https://twitter.com/ChloeAmandaB/status/1597135708426469377?s=20&t=fB8DDE5NExI5CdzL6El8mA

https://twitter.com/ChetanC75495924/status/1597131093047906304?s=20&t=LqXa3V5BoCTsb8x1KEs–Q

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तरप्रदेशने नाणेेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. महाराष्टा्राने प्रथम फंलदाजी करत 5 गडी गमावत 330 धावा केल्या. महाराष्ट्राच्या 48 षटकाअखेर 272 धावा होत्या. त्यानंतर गोलंदजीसाठी शिवा सिंग हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आला. ऋतुराजने त्याच्या या षटकात सगल 7 षटकार खेचत महाराष्ट्राची धावसंख्या 49 षटकाअखेर 315 वर पोहोचवली. त्याच्या या खेळीमुळे महाराष्ट्राची स्थिती या सामन्यात मजबुत झाली. महाराष्ट्राचा हा खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे. (Fans are praising Ruturaj Gaikwad for his 7consecutive Sixes in single over)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गज म्हणतोय, ‘पृथ्वी शॉ टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा दावेदार’
भारताच्या दिग्गजाचा मोफत सल्ला; म्हणाले, ‘भारताने वनडेत एकच संघ खेळवावा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---