---Advertisement---

‘किंग कोहली’ला कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळताना पाहण्यापूर्वी चाहते भावूक, दिल्या ‘अशा’ प्रतिक्रीया

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 12:41 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे दार बंद झाले आहे. रविवारी (७ नोव्हेंबर) अफगानिस्तान संघ पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. ज्यामुळे आता नामिबिया विरुद्ध होणारा सामना हा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या टी२० कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बरेच अविस्मरणीय विजय मिळवले. त्यामुळे कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळत असलेल्या विराट कोहलीसाठी अनेकांनी ट्विट केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, आपण भाग्यवान आहोत की, भारतीय संघाला विराट कोहलीसारखा कर्णधार मिळाला. तर अनेकांचे असेही म्हणणे आहे की, ते खेळाडू देखील भाग्यशाली आहेत, ज्यांना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली.

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “या खेळाडूसाठी खूप वाईट वाटतंय. नेहमी त्याने मैदानावर २०० टक्के दिले. परंतु नेहमी तो पराभूत होणाऱ्या संघातून राहिला. तो आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा हकदार आहे.” तर आणखी एका पाकिस्तानी युजरने लिहिले की, “विराट कोहलीचे फक्त कौतुक करणारे ट्विट. तुमच्या सर्वांना हवे तसे झाले नाही! पण तो खंबीर उभा राहिला आणि राजा म्हणून संघाचे नेतृत्व केले! मी त्याच्या खेळाचा आणि त्याच्या खिलाडूवृत्तीचा खरोखर आदर करतो.”

तसेच आणखी एका युजरचे म्हणणे आहे की, त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर तो पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्याने लिहिले की, “या विंटेज कोहलीला पुन्हा पाहायचे आहे. जो कोणत्याही भीती आणि दबावाशिवाय फलंदाजी करतो. नव्या डावासाठी शुभेच्छा .”

https://twitter.com/smileandraja/status/1457330725892640773?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1457330725892640773%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Find-vs-nam-live-virat-kohli-will-play-his-last-t20-match-for-india-as-captain-fans-are-sharing-emotional-posts-on-social-media-51944%2F

https://twitter.com/toheedx_/status/1457390119992897545?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1457390119992897545%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Find-vs-nam-live-virat-kohli-will-play-his-last-t20-match-for-india-as-captain-fans-are-sharing-emotional-posts-on-social-media-51944%2F

https://twitter.com/thelostrival/status/1457392691784798208?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1457392691784798208%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.insidesport.in%2Fcricket-news%2Find-vs-nam-live-virat-kohli-will-play-his-last-t20-match-for-india-as-captain-fans-are-sharing-emotional-posts-on-social-media-51944%2F

कर्णधार म्हणून विराट कोहलीची कारकीर्द 
विराट कोहलीने कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४९ सामने खेळले आहेत. ज्यामधे २९ सामन्यात त्याला विजय मिळवून देण्यात यश आले आहे. तर १६ सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच २ सामने बरोबरीत सुटले आणि २ सामने अनिर्णीत राहिले होते. तसेच माजी कर्णधार एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये ४१ सामन्यात त्याला विजय मिळवून देण्यात यश आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

गेल्या ९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतावर ओढावली ही नामुष्की, उपांत्य फेरीपर्यंतही मारता आली नाही मजल

कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा

इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---