आगामी जून महिन्यात भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडच्या संघाचे आव्हान असेल.
न्यूझीलंडचा संघ या सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहोचला असून त्यांनी तयारीला देखील सुरुवात केली आहे. यातच सोशल मिडीयावर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत न्यूझीलंडचे खेळाडू रॉस टेलर आणि टीम साउदी एका भारतीय चाहत्यासह बोलतांना दिसत आहेत.
विराट कोहलीची विकेट घेणार साउदी?
या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे गोलंदाज विरूद्ध भारतीय फलंदाज हा सामना विशेष लक्षवेधी असेल. इंग्लंडच्या वातावरणाला साजेसे गोलंदाजी आक्रमण न्यूझीलंडकडे असल्याने भारताच्या फलंदाजांना विशेष मेहनत करावी लागेल. विशेषतः न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदी भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. असाच प्रश्न इंग्लंडमधील एका भारतीय चाहत्याला देखील पडला होता. ज्यावर टीम साउदीने भन्नाट उत्तर दिले.
त्याचे झाले असे की इंग्लंडमधील एका विमानतळावर एका भारतीय चाहत्याला रॉस टेलर आणि टीम साउदी दिसले. त्यांना पाहून त्यांच्यासह फोटो काढण्याचा मोह या चाहत्याला आवरला नाही. म्हणून त्याने या दोन्ही खेळाडूंसह फोटो काढला. यावेळी या चाहत्याने रॉस टेलरला आगामी मालिकेसाठी ऑल द बेस्ट दिले. तर टेलर नंतर साउदीसह फोटो काढताना त्याला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराट कोहलीची विकेट घेणार का? असा प्रश्न विचारला. यावर साउदीने ‘असे झाले तर चांगलेच होईल’, असे उत्तर दिले. ईएसपीएन क्रिकइन्फोने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
A fan meets Ross Taylor, and has a question for Tim Southee ????#WTCFinal #ENGvNZ pic.twitter.com/VGFLyc5yfJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 17, 2021
इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड खेळणार कसोटी मालिका
दरम्यान, न्यूझीलंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड संघाशी कसोटी मालिकेत दोन हात करेल. मात्र अद्याप न्यूझीलंडचे सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल होणे, बाकी आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर काही खेळाडू मालदीवला रवाना झाले होते. तिथे आपले विलगीकरण पूर्ण करून आता ते काहीच दिवसात इंग्लंडमध्ये दाखल होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथ-वाॅर्नरचे पुनरागमन तर लॅब्यूशेनला वगळले! ‘असा’ आहे विंडीज दौऱ्यासाठीचा ऑस्ट्रेलियन संघ
‘अपने साथ मत जोडीये हमको’! स्वत:ची कॅलिस-वॉटसनशी तुलना करणाऱ्या विजय शंकरची नेटकऱ्यांनी घेतली शाळा






