ऑस्ट्रेलियन संघ येत्या जून महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली. या संघात वरिष्ठ खेळाडू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांचे मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन झाले आहे. मात्र युवा फलंदाज मार्नस लॅब्यूशेनला कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे या संघात स्थान देण्यात आले नाही.
स्मिथ, वॉर्नर आणि कमिन्स हे त्या सात खेळाडूंमधील खेळाडू आहेत, ज्यांना मार्च महिन्यात न्यूझीलंड दौर्यावरील संघात स्थान मिळाले नव्हते. कारण या खेळाडूंची निवड त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार्या कसोटी मालिकेसाठी करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियन खेळाडू परतले मायदेशी
बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात आयोजित करण्यात आलेल्या आयपीएल मध्ये सहभागी झाले होते. मात्र हा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आल्याने ते मायदेशी परतले आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणार्या प्रवाशांवर बंदी घातल्याने या खेळाडूंची अडचण झाली होती. मात्र नंतर मालदीव मध्ये दहा दिवसांचे विलगीकरण पूर्ण करून हे खेळाडू आता सुरक्षितपणे मायदेशी परतले आहेत.
दरम्यान, मार्नस लॅब्यूशेनला मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे या संघात स्थान मिळाले नाही. लॅब्यूशेन इंग्लंडमध्ये ग्लेमॉर्गन संघासाठी कौंटी क्रिकेट खेळत होता. पण इंग्लंडच्या कोरोना संबंधी नियमांमुळे त्याला तिथेच विलगीकरणात राहावे लागले आहे. त्यामुळे त्याचा या ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला नाही.
ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य निवडकर्ते ट्रॅव्हर हॉन्स म्हणाले, “जे मार्नस लॅब्यूशेनला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तो ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी काहीही करू शकतो. परंतु आता परिस्थिती कोणाच्याही हातात नसल्याने त्याला संघात स्थान देणे शक्य झाले नाही. यामुळे तो देखील चांगलाच निराश झाला आहे. आम्ही या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्याच्याशी अनेकवेळा चर्चा केली. मात्र अखेर आम्ही त्याने इंग्लंडमध्येच राहणे योग्य आहे, या निष्कर्षावर येऊन पोहोचलो. जर ही वैश्विक महामारी नसती, तर मार्नस नक्कीच या दौर्यावर संघाचा भाग असता.”
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ –
एरोन फिंच, एश्टन एगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, एलेक्स कैरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मोइसिस हेन्रीक्स, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, राइली मेरेडिथ, जोश फिलीप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीन सिंह, डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, एंड्रयू टाय, मैथ्यू वेड, डेविड वाॅर्नर, एडम जम्पा.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अपने साथ मत जोडीये हमको’! स्वत:ची कॅलिस-वॉटसनशी तुलना करणाऱ्या विजय शंकरची नेटकऱ्यांनी घेतली शाळा
भारत-श्रीलंका मालिकेआधी खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी, वाचा सविस्तर प्रकरण
‘मी बेनक्रॉफ्टच्या बाजूने’, बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूस भारतीय दिग्गजाचा पाठिंबा