---Advertisement---

‘मी बेनक्रॉफ्टच्या बाजूने’, बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूस भारतीय दिग्गजाचा पाठिंबा

On: सोमवार, मे 17, 2021 3:50 PM
---Advertisement---

सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान बॉल टेम्परिंग प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रामाणिकपणाबद्दलही प्रश्न उपस्थित केला जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कनंतर आता माजी भारतीय कसोटीपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रानेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या विषयावर आपण कॅमेरून बेनक्रॉफ्टसोबत असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गोलंदाजांना याची कल्पना असणार
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “मी या प्रकरणात कॅमेरून बेनक्रॉफ्टसोबत आहे. त्याने हे स्पष्टपणे सांगितले नाही परंतु सर्वांना हे माहित आहे की, चेंडूशी केली गेलेली छेडछाड गोलंदाजांना नक्कीच माहीत असणार. चेंडू हातात आल्यावर चेंडूची छेडछाड केली गेली आहे की नाही हे चेंडूच्या आकारावरून गोलंदाजांना लगेच समजते.”

ते खेळाडू खोटे बोलतात
आकाश चोप्रा याने ऑस्ट्रेलिया संघावर खोटे बोलण्याचा आरोप केला. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघाला बॉल टेम्परिंगबाबत विशेषत: गोलंदाजाबद्दल माहित नव्हते यावर माझा विश्वास नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नक्कीच खोटे बोलत आहेत.” ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कनेही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना या विषयावर घेरले आहे. क्लार्कच्या म्हणण्यानुसार, त्याला असे वाटते की बॉल टेम्परिंगबद्दल गोलंदाजांना माहिती असणार.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील काळी घटना
सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर घडलेले बॉल टेम्परिंग प्रकरण ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याप्रकरणी तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर तसेच, चेंडूवर सॅंडपेपर घासणारा तरुण फलंदाज कॅमेरून बेनक्रॉफ्टला यांना दोषी धरले होते. या घटनेनंतर वॉर्नर आणि स्मिथला प्रत्येकी १ वर्षाच्या तर बेनक्रॉफ्टला ९ महिन्यांच्या बंदीचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

एकेकाळी टीम इंडियातून बाहेर झालेला क्रिकेटर म्हणतोय, ‘मी कॅलिस किंवा वॉटसनसारखा अष्टपैलू बनू शकतो’

‘नॅशनल क्रश’ रश्मिका विराट-रोहित नव्हे ‘या’ क्रिकेटपटूची आहे जबराट फॅन, नाव आहे तुमच्याही ओळखीचं

पहिल्याच भेटीत विराटने सचिनच्या पायाशी घातले होते लोटांगण, ‘मास्टर ब्लास्टर’ही गेला होता गोंधळून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---