दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंधानाने नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला तिचा आवडता आयपीएल संघ म्हणून घोषित केले होते. पण आता तीने आवडत्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले आहे. तिच्या या उलगड्यामुळे आरसीबीच्या समर्थकांना काही प्रमाणात दुःख झाले असेल. कारण तिने आरसीबीच्या समर्थकांच्या अपेक्षेविरूद्ध चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपला आवडता क्रिकेटपटू म्हटले.
अलीकडेच सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान एका चाहत्याने रश्मिकाला तिच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव विचारले. चाहत्यांनी अशी अपेक्षा केली होती रश्मिका आरसीबीची समर्थक असल्याने तिचा आवडता क्रिकेटपटूही विराट असेल. पण ती धोनीची फॅन आहे.
रश्मिकाने चाहत्याला उत्तर देताना महेंद्रसिंग धोनीला एक महान क्रिकेटपटू म्हटले आहे. इतकेच नाही तर तिने धोनीच्या कर्णधारपदाचे, यष्टीरक्षक आणि फलंदाजीचेही कौतुक केले आहे. रश्मिका म्हणाली, “मी काय बोलू. धोनीची फलंदाजी, कर्णधारपद आणि यष्टीरक्षण या सगळ्या गोष्टी विलक्षण आहेत. तो एक मास्टरक्लास खेळाडू आहे. तो माझा हिरो आहे.”
अलीकडे ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाला एका चाहत्याने सोशल मीडियावर तिच्या आवडत्या आयपीएल टीमबद्दल विचारले होते. प्रत्युत्तरादाखल ती म्हणाला होती, ‘ई साला कप नमदे.’ वास्तविक ही आरसीबीची अधिकृत घोषणा आहे. कन्नड चाहत्यांनी संघाचा उत्साह वाढविण्यासाठी याची सुरुवात केली होती. मात्र आता रश्मिकाने धोनी आपला आवडता क्रिकेटपटू असल्याने मान्य केल्याने आरसीबी आणि विराटच्या चाहत्यांची मने मोडली असावीत.
आयपीएल 2021 मध्ये विराटच्या आरसीबी आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने शानदार कामगिरी केली होती. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द होण्यापूर्वी सीएसकेने 7 सामने खेळले होते आणि त्यात 5 विजय मिळवले होते. गुणतालिकेत सीएसकेने 10 गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. तर दुसरीकडे, आरसीबीने देखील 7 सामने खेळलेले होते आणि सीएसकेच्या बरोबरीनेच 5 विजय मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच भेटीत विराटने सचिनच्या पायाशी घातले होते लोटांगण, ‘मास्टर ब्लास्टर’ही गेला होता गोंधळून
पाकिस्तानी गोलंदाजाने तोडली होती बरगडी, तशाच अवस्थेत चार महिने सचिनने खेळले होते क्रिकेट