---Advertisement---

प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 3:30 PM
---Advertisement---

आपण मैदानात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना प्रोस्ताहन देताना पाहिले आहे. खेळाच्या मैदानात चाहत्यांची उपस्थिती खेळाडूंसाठी फायदेशीर ठरत असते. कारण चाहते खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवायचे काम करत असतात. जर तुम्हाला कोणी सांगितले की, चाहते खेळाडूचा आत्मविश्वास वाढवायच्या ऐवजी त्यांना मारहाण करतात, तर तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, ही गोष्ट खरी आहे. नुकतीच ही क्वचितच पाहायला मिळणारी घटना घडली आहे. लीग १ (LIGUE 1) या फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान अशी घटना घडली आहे.

https://twitter.com/jpaterson97/status/1429540577402576901?s=20

नाईस (nice) विरूद्ध मार्सिले (marseille) या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी विरोधी संघाच्या खेळाडूंवर हल्ला केला आहे. या घटनेत मार्सिले (marseille) संघाचा खेळाडू दिमित्री पायेट (dimitri payet) गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.

सामन्यामध्ये नाईसचा संघ १-० अशा आघाडीवर होता. सामना संपण्याच्या आधी दिमित्री पायेटवर स्टेडियममधील प्रेक्षकांनी बाटली फेकली. यानंतर दिमित्रीने ती बाटली माघारी प्रेक्षकांमध्ये फेकली होती. त्याने बाटली माघारी फेकल्यानंतर विरोधी संघाचे चाहते मैदानात उतरले. मैदानावर काही काळ भांडणं चालले. त्यानंतर रेफरीने दोन्ही संघांना मैदानातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आणि सामना स्थगित करण्यात आला.

सामना स्थगित होण्याआधी ७५ व्या मिनिटापर्यंत नाईस संघ कैस्पर डोलबर्गने केलेल्या गोलमुळे १-० अशा आघाडीवर होता. लीग १ च्या नियमांनुसार जर एखादा संघ काही कारणास्तव सामना पूर्ण करू शकला नाही. तर विरोधी संघाला ३-० ने विजयी घोषित केले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

शून्य अनुभव असूनही ‘विराटसेना’ करणार लीड्स कसोटी फत्ते! गाळतेय भरपूर घाम

पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी होल्डरचा डावपेच, मुद्दाम छेड काढत ‘अशी’ घेतली विकेट

‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---