इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाच्या अप्रतिम डावानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने एकाकी झुंज दिली. नाबाद १८० धावांची विलक्षण खेळी करत त्याने संघाला तिसऱ्या दिवसाखेर २७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. एकीकडे रूटच्या खेळीवर सर्वांच्या नजरा लागून होत्या; दुसरीकडे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे.
लॉर्ड्सवरील इंग्लंड-भारत कसोटी सामना पाहण्यासाठी बऱ्याचशा क्रिकेट दिग्गजांनी हजेरी लावली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना स्टेडियममध्ये पाहण्यात आले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त इंग्लंडचे माजी कर्णधार व जगप्रसिद्ध समालोचक जेफ्री बॉयकॉट हेसुद्धा हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. अशात एक नवीच व्यक्ती सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉयड स्टँड्समध्ये एका व्यक्तीशी चर्चा करताना दिसून आले होते. लॉयड ज्यांना बोलत होते, ती व्यक्ती हुबेहूब दिग्गज बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासारखी दिसत होती. त्यामुळे त्यांना पाहून नेटकरी आणि सामना दर्शकांच्या भुवया उंचावल्या.
Gulabo Sitabo’s @SrBachchan in a suit at the Lord’s Cricket Ground pic.twitter.com/WfdUya6WGx
— Jitendra Jain (@JitendraJain_) August 14, 2021
Clive Lloyd spotted with british Amitabh Bachchan. #EngvInd
— Silly Point (@FarziCricketer) August 14, 2021
Fauxy news : @SrBachchan watching match with great Clive Lloyd at Lords . pic.twitter.com/7NQyRIA59h
— S R Ramnarayan (@SRRamnarayan1) August 14, 2021
चक्क बिग बी कसोटी सामना पाहण्यासाठी आल्याचे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. अनेकांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मात्र ती व्यक्ती कोण आहे, लॉयड त्यांना कसे ओळखतात? हे अद्याप समजलेले आहे.
Anthony Gonsalves @SrBachchan with Clive Lloyd at Lord's #engvsind #indvseng pic.twitter.com/L1dhHWTOWK
— Anmol Sharma (@AnmolSharma__) August 14, 2021
दरम्यान लॉर्ड्स कसोटीचा तिसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार रूटने गाजवला. भारताच्या ३६४ धावांच्या भल्यामोठ्या लक्ष्यापुढे तो मजबूत खांबाप्रमाणे उभा राहिला. एका बाजूने विकेट जात असताना त्याने दीडशतकी खेळी साकारली. डावाखेर भारतीय गोलंदाजांना त्याला बाद करण्यात यश आले नाही. अखेर संघातील १० च्या १० फलंदाज बाद झाल्यामुळे इंग्लंडचा डाव ३९१ धावांवर संपला. यात रूटच्या १८० धावांचा समावेश आहे. ३२१ चेंडूंचा सामना करताना १८ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा फटकावल्या आहेत.
यासह इंग्लंडने पहिल्या डावात नाममात्र २७ धावांची आघाडी घेतली आहे. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज इंग्लंडला विजयासाठी किती धावांचे लक्ष्य देतील? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आले आले!! क्वारंटाईन संपवून पृथ्वी अन् सूर्यकुमार भारताच्या ताफ्यात सहभागी, खेळणार तिसरी कसोटी?
दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबलाय सीएसके संघ, एका दिवसाचे भाडे ऐकून उडेल तुमची झोप!
यंदा आयपीएलप्रेमींची संपणार प्रतिक्षा, युएई सरकारचा प्रेक्षकांच्या उपस्थितीस हिरवा कंदील






