विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बुधवारी निकाल लागला. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. कसोटी क्रिकेटचा पहिला किंग न्यूझीलंड संघ झाला. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघापेक्षा सर्वच प्रकारात वर्चस्व दाखवले. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी सोबत त्यांनी क्षेत्ररक्षणाचा सुद्धा चांगला नमुना दाखविला. मात्र, या सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे भारतीय समर्थक विराट कोहलीवर भडकले आहेत .
न्यूझीलंड विरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर ट्विटरवर लगेचच ‘चोकर्स’ शब्द ट्रेंड झाला. चोकर्सचा शब्द आजवर दक्षिण आफ्रिका संघाला बोलले जात होते. कारण की, जबरदस्त संघ असूनही त्यांचा नेहमी महत्वपूर्ण सामन्यात पराभव होत असे. सध्या भारतीय संघा सोबतसुद्धा तेच होत आहे.
भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ची शेवटची स्पर्धा २०१३ साली जिंकली होती. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर जेवढ्या आयसीसीच्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धेत भारतीय संघाला बाद फेरीत हार मिळाली आहे.
त्यामुळेच चाहत्यांनी सगळा राग विराट कोहलीवर काढला आहे. तसेच क्रिकेटमधील नवा ‘चोकर’ म्हणूनही चाहत्यांकडून कोहली आणि भारतीय संघावर कडाडून टीका केली आहे. गेल्या ३-४ वर्षांत कसोटीत उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडून चाहत्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले गेले.
दरम्यान, ट्विटरवर महेंद्र सिंग धोनीचे नावही ट्रेंड करत आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली टी-२० विश्व चषक, २०११ साली एकदिवसीय विश्व चषक आणि २०१३ साली ट्रॉफी जिंकली होती. त्याच्यानंतर विराटला आत्तापर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अनेकांनी विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे.
Virat Kohli and Rohit Sharma after reaching India : pic.twitter.com/2QvULEOovT
— Manoj Pareek (@mrpareekji) June 23, 2021
Virat Kohli is just luckless as a captain. His tactics are fine.
— frank (@franklinnnmj) June 24, 2021
Under Virat kohli captaincy #IndianCricketTeam becoming RCB…
Eee saala cup namde— 〽️@#€$# (@mahi_614) June 24, 2021
You was best in 2019
You are best in 2021
We was chockers in 2019
And
We are still chockers in 2021#congratulationsNZ #CHOCKERS #sportstak #sportstakisback @vikrantgupta73 @rawatrahul9 @Gagan_Media @anujshukla188 @anilsingh1601 ……..— Prathamesh Ahire (@Prathamesh12003) June 23, 2021
As always,
Virat and his captaincy will be blamed for everything once again🙂 pic.twitter.com/2iE3tG1kZk— Harsh⁶³ (@HarshRo45__) June 23, 2021
#captaincy
Now It's the Time.
What ever Virat fans call it
India need to change the Captaincy.
New Era after Legend MS Dhoni
Must Come in the name of Rohit Sharma
India needs New Captaincy#Captaincy #ICCWorldTestChampionship #WTC2021Final #INDvNZ #RohitSharma pic.twitter.com/75v7KRtwSD— HINDU🧡🕉️🚩 (@HINDUBHAKTOM) June 24, 2021
https://twitter.com/Own_thoughtz/status/1407755117655322630
Being Virat Kohli isn't easy 🥺💔 pic.twitter.com/iHvqUmyzvF
— Shiva (@raja_shivanath) June 23, 2021
From last 4,5 years india is winning the small tournaments but they failed at the larger one, just like what happened to south africa team we call them chokers, now the new chokers under virat's captaincy#chokers pic.twitter.com/yN4F2ZVbBD
— Dr.Rahul Tiwari (@RahulTiwari002) June 23, 2021
अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात १३९ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान न्यूझीलंडने ४६ षटकांत केन विलियम्सन आणि रॉस टेलरने केलेल्या नाबाद ९६ धावांच्या भागीदारीमुळे सहज पूर्ण केले. विलियम्सनने ५१ धावांची तर टेलरने ४७ धावांची नाबाद खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्यानंतर रॉस टेलरला आनंदाश्रू अनावर, मुलाखतीतही खूप रडला
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात वॅटलिंगने अव्वल यष्टीरक्षक धोनीला पछाडलं, मोडला ‘हा’ विक्रम