---Advertisement---

सारा तेंडुलकरने ‘ती’ पोस्ट शेअर करताच, चाहत्यांना पुन्हा आठवला शुबमन गिल

On: गुरूवार, जुलै 8, 2021 4:52 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपल्या देशासह आपले नावही यशाच्या शिखरावर पोहचवले आहे.  सचिनच्या यशामुळे आणि प्रसिद्धीमुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही चर्चा होत असते. त्याची मुलगी सारा तेंडुलकर देखील बऱ्याचदा चर्चेत असते. सारा इंस्टाग्राम नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमी आपले फोटो पोस्ट करत राहते. त्याचबरोबर अनेकदा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर या दोघांचे अफेयर असल्याच्या चर्चा होत असतात.

मागील काही दिवसांपूर्वी शुबमन आणि साराच्या सोशल मीडियावरील काही गोष्टींनी त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच शुबमनने एक पोस्ट करत तो सिंगल असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तरीही काही चाहते अनेकदा शुबमन आणि साराला एकमेकांच्या नावाने ट्रोल करत असल्याचे दिसून येते.

नुकतेच साराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर चाहत्यांनी शुबमनचे नाव घेत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साराने केला फोटो पोस्ट
सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सारा एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली दिसून येत आहे. साराने काळा आणि पांढराचा रंगाचा ड्रेस घातलेला आहे. त्याचबरोबर तिने केस बांधले आहेत. सारा या फोटोत हनवटी जवळ हात ठेऊन एकटक बघत असल्याचे दिसत आहे.  हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिनं लिहिले की, ‘अरे सीरी, माझे जेवण कुठे आहे?’

साराने पोस्ट केलेला हा फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. साराच्या पोस्टला आत्तापर्यंत 3 लाख 30 हजार पेक्षाही जास्त लाइक्स आणि 2200 पेक्षाही जास्त कमेंट मिळाले आहेत. या फोटोला कमेंट करत चाहत्यांने तिच्या लूक्सचे खूप कौतुक केले. तर काही लोकांनी शुबमन गिल आणि तिच्या मधल्या नात्यावर कमेंट केली.

https://www.instagram.com/p/CQ86bUhrv1v/

साराच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या अशा कमेंट
पंजाबी, सूफी आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांना आवाज देणारी हर्षदीप कौरनेही साराच्या पोस्टवर कमेंट केली आहे. हर्षदीप कौरने कमेंट केली की, ‘ तुझ्या केसाची पोनीटेल आनंदी वाटत आहे.’ हर्षदीप कौरने केलेल्या कमेंटवर देखील अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे.

Photo Courtesy: Instagram/@saratendulkar

तर, काही इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी कमेंट केली की, ‘शुबमन गिलच्या घरी जेवण आहे.’ तर एका चाहत्याने कमेंट केली की, ‘शुबमन गिलला फोन कर तो जेवण आणून देईल.’

Photo Courtesy: Instagram/@saratendulkar

सध्या शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत गेलेला आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये शुबमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे तो इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या अगामी कसोटी मालिकेमधून संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतासोबत खेळून मालमाल होणार श्रीलंका क्रिकेट, ६ सामन्यांचे मिळणार चक्क ‘इतके’ कोटी

सध्याच्या भारतीय संघातील केवळ ‘हे’ ६ खेळाडू खेळलेत श्रीलंकेविरुद्ध वनडे; एकट्या द्रविडच्या धावा आहेत त्यांच्यापेक्षा अधिक

‘अशी होती दादासोबत ५ वर्षांची राईड’ म्हणत विरूच्या बड्डे बॉय गांगुलीला लक्षवेधी अंदाजात शुभेच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---