क्रिकेट सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये अनेकदा चाहते वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. पण मैदानाबाहेरही चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी अनेक अनोख्या गोष्टी करत असतात. याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारताच्या काही क्रिकेटपटूंचे हॉटेलमधील जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांनतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. आता पुढील सामना 7 जानेवारीला सिडनी येथे आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे. या दरम्यान भारतीय संघाचे खेळाडू सध्या मेलबर्नमध्ये सराव करत आहेत, तसेच तेथील आजूबाजूच्या परिसरातही फिरत आहे.
दरम्यान भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी असे काही खेळाडू एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तिथे भारतीय खेळाडूंचा एक चाहताही त्याच्या पत्नीसह आला होता. तो खेळाडूंच्या जवळच्या टेबलवरच बसला होता. त्यामुळे त्याने जेव्हा भारतीय क्रिकेटपटूंना पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याने या खेळाडूंचा छोटा व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
Bc mere saamne waale table par gill pant sharma saini fuckkkkkk pic.twitter.com/yQUvdu3shF
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
एवढेच नाही तर त्याने क्रिकेटपटूंना अधिक काळ पाहाता यावे म्हणून स्वत:साठी खाण्याची एक्ट्रा डिशही मागवली. तसेच त्याने नंतर चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बिलही भरले. याबाबत त्याने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. या चाहत्याचे नाव नवलदीप सिंग आहे.
They are not aware but i have paid there table bill 🙂 . Least i can do for my superstars ???? pic.twitter.com/roZgQyNBDX
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
तसेच त्याने पुढे ट्विट करत सांगितले की जेव्हा त्याने बिल भरल्याने भारतीय क्रिकेटपटूंना कळाले, तेव्हा ते सर्व त्याला भेटले. रोहित त्याला म्हणाला, पैसे घे रे असं चांगल वाटत नाही. त्यावर हा चाहता म्हणाला, नाही, हे मी स्वत: केले आहे. तसेच या चाहत्याने सांगितले की त्याला पंतने मिठी मारली आणि सांगितले की आम्ही तुझ्याबरोबर फोटो तेव्हाच काढू जेव्हा तू पैसे घेशील. पण या चाहत्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. अखेर सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले.
नंतर या चाहत्याने असेही सांगितले की पंत या चाहत्याच्या पत्नीला म्हणाला, भाभीजी, जेवणासाठी धन्यवाद.
When they got know that i have paid the bill.. Rohit sharma said bhaji pese lelo yaar acha nai lagta.. i said no sir its on me. Pant hugged me and said photo tabhi hogi jab pese loge wapis. I said no bro not happening. Finally sabane photo khichwai 🙂 mja aa gya yaar #blessed
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
Pant to my wife before leaving – Thank you bhabhi ji for the lunch ????????
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
भारतीय संघाने दिली होती या पदार्थांची ऑर्डर –
या चाहत्याने बिल दिलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात दिसते की भारतीय क्रिकेटपटूंनी सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डायट कोक अशी ऑर्डर दिली होती. तसेच त्यांचे बिल 118.69 डॉलर (जवळपास 6683 रुपये) एवढे आले होते. हे सर्व बिल या चाहत्याने भरले.
भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी 4 जानेवारीनंतर सिडनीला जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये ‘या’ अष्टपैलू खेळाडूचा होता समावेश
मुश्ताक अली स्पर्धेसाठी बडोद्याच्या संघातून युसूफ पठाणला वगळले, ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे नेतृत्व
सिडनी कसोटीवरील चिंतेचे ढग कायम; वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयोजनावर संभ्रम






