सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. तिथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. परंतु, भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्याने आता भारतात आल्यावर नवीन वर्षाची पार्टी करतानाचे फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्यानंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला आहे. भारतात परतल्यानंतर त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि काही मित्र तसेच हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यासह पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
विराट कोहलीने शेअर केले नवीन वर्षाच्या पार्टीचे फोटो
या पार्टीचे फोटो आणि नवीन वर्षाची शुभेच्छा देताना विराट कोहलीने ट्विट करताना लिहिले, “निगेटिव्ह टेस्ट आलेल्या मित्रांसोबत पॉझिटिव्ह वेळ घालवला. सुरक्षित वातावरणात घरामध्ये मित्रासोबत चांगले क्षण घालवण्यापेक्षा चांगले काहीच नाही. हे वर्ष खूप सारे आनंद, आशा आणि चांगले आरोग्य घेवून येवो. सुरक्षित रहा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”
Friends who test negative together spend positive time together! ☺️ Nothing like a get together at home with friends in a safe environment. May this year bring a lot of hope, joy, happiness and good health. Stay safe! #HappyNewYear2021 pic.twitter.com/EyFcUBLqMi
— Virat Kohli (@imVkohli) January 1, 2021
या ट्विटमध्ये विराट कोहलीने दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटो अनुष्का शर्मा खुर्चीवर बसली आहे आणि तिच्यामागे विराट उभा आहे. तसेच दुसर्या फोटोत विराट, अनुष्का, मित्र परिवार आणि हार्दिक पंड्या व त्याची पत्नी नताशा हे सर्वजण पार्टीसाठी एकत्र आलेले दिसत आहेत.
या महिन्यात विराट कोहली वडील होणार
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर आहे आणि ती त्यांच्या बाळाला या महिन्यात जन्म देणार आहे. त्यामुळे विराट कोहली पालकत्व रजा घेवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतला आहे.
विराट कोहलीला काही दिवसापूर्वीच नवीन वर्षाची भेटवस्तू मिळाली आहे.
विराट कोहलीला नवीन वर्षाची भेटवस्तू काही दिवसापूर्वी मिळाली आहे. त्याला आयसीसीने दशकातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून निवडले आहे. याशिवाय त्याला दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू म्हणून सुद्धा निवडले आहे. त्याचबरोबर आयसीसीच्या वनडे, कसोटी आणि टी-20 संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तो एकमात्र खेळाडू आहे, ज्याची तीनही संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुश्ताक अली स्पर्धेसाठी बडोद्याच्या संघातून युसूफ पठाणला वगळले, ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे नेतृत्व
“हा भारतीय गोलंदाज अतिशय चाणाक्ष”, शोएब अख्तरने केले कौतुक
सिडनी कसोटीवरील चिंतेचे ढग कायम; वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयोजनावर संभ्रम






