फलंदाजी आणि गोलंदाजीत सरस कामगिरी करत भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. ६६ धावांनी हा सामना खिशात घालत भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यानंतर शुक्रवारी (२६ मार्च) पार पडलेला दुसरा वनडे सामना जिंकत मालिकेत विजयी घोददौड कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
अशात विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला या सामन्यात वनडे पदार्पणाची संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र यावेळीही त्याला बाकावर बसवण्यात आल्याने चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.
पहिल्या वनडे सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर याला दुखापत झाली होती. त्याची दुखापत जास्त गंभीर असल्याने तो वनडे मालिकेतील अखेरचे २ सामने खेळणार नाही. त्यामुळे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यात तरबेज असलेल्या सूर्यकुमारचे खेळणे जवळपास निश्चित असल्याची सर्वांची धारणा होती.
मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी न करता यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची निवड केली. यामुळे चाहत्यांचे मन दुखावले असून त्यांनी संघ व्यवस्थापन आणि खासकरुन कर्णधार विराटवर निशाणा साधला आहे. अनेकांनी मीम्सद्वारे विराटवर टीका केली आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
It's a toss-up bw Pant & Sky, Pant got the chance today (lefty) . What's so unfair about it ? When Pant became so successful in the last 2 test series, Rohit Sharma & MI fans flooded the internet saying that Rohit always backed him, but when he gets a chance, u ppl are unhappy!
— Sri (@sri_opines) March 26, 2021
Well if KL is the preferred middle order keeper than SKY should have been in for Iyer. Can't understand this decision but nevertheless England again won the toss and are fielding first. Looking towards a big score today.#INDvsEND #SuryakumarYadav
— Sufiyan Mohammad (@iamsufiyaan7) March 26, 2021
@imVkohli@RaviShastriOfc
When are you Going to give the opportunity to SKY…, after your retirement…ha..bolo kholi…? From die_hard fan of @surya_14kumar @BCCI @SGanguly99 @JayShah #SuryakumarYadav #IndiavsEngland @ICC @virendersehwag @DeepDasgupta7 @chetans1987 @ndtv— hare Krishna…(let's hunt down the Gold Diggers ) (@Krishthefighter) March 26, 2021
Kohli : Dekh yeh match jeetne de 3rd match me tu definitely debut karega.
Suryakumar Yadav : pic.twitter.com/8vkqsD8LRp
— Pranal (@PranalMeshram3) March 26, 2021
https://twitter.com/potu947/status/1375352164516646921?s=20
Surya Kumar Right Now : #SuryakumarYadav #suryakumar #RishabhPant #INDvENG #indvsEng #TeamIndia #IndiavsEngland #ViratKohli #Cricket #JosButtler #Krunalpandya pic.twitter.com/46TVODqjND
— Shashwat Shukla (शुक्ला जी) (@shashwatshukla_) March 26, 2021
https://twitter.com/RajAjayPandya/status/1375356017731461128?s=20
Am not sure, what happened to @imVkohli We have three ODI'S. why he is not giving chance to @surya_14kumar and not sure when he is going get chance to prove him self as a good batsmen. what else @imVkohli expecting from @surya_14kumar.#INDvEND #SuryakumarYadav #staraikelungal
— Edison George (@edison_george1) March 26, 2021
वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर अखेर इंग्लंडविरुद्ध सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्याद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर टी२० मालिकेतील ३ सामन्यात खेळताना त्याने ८९ धावा चोपल्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
या कामगिरीला पाहता इंग्लंडविरुद्धच्या वनडे संघातही त्याला स्थान मिळाले. मात्र अद्याप अंतिम ११ जणांच्या पथकात खेळण्याचे सौभाग्य त्याला लाभले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या पहिल्या स्थानाला धोका; ‘अशी’ कामगिरी केली तर भारतीय संघ अव्वल क्रमांकावर होणार विराजमान
कॅप्टन कोहलीचा मोठा किर्तीमान, दिग्गजांना पछाडत वनडेतील ‘या’ विक्रमांत टॉप-५ मध्ये उडी
विराट जिथे विक्रम तिथे! एकाच क्रमांकावर १०,००० वनडे धावा; पाँटिंगची केली बरोबरी