भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) होत आहे. या सामन्यासाठी झालेली नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने विसावी धाव घेत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
अशी कामगिरी करणारा विराट बनला दुसरा फलंदाज
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा पुणे येथील दुसऱ्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने या डावात विसावी धाव घेऊन वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १०,००० धावा पूर्ण केल्या. १९२ डावात त्याने ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याच्यानंतर केवळ दुसरा फलंदाज बनला. पॉंटिंगने आपल्या वनडे कारकीर्दीत ३३५ डाव तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक १२,६६२ धावा केल्या आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा असून त्याने ९७४७ धावा केल्या आहेत. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस व न्यूझीलंडचा वर्तमान कर्णधार केन विलियम्सनचा क्रमांक लागतो त्यांनी अनुक्रमे ७७७४ व ५४२१ धावा ठोकल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१२६६२- रिकी पॉटींग, सामने- ३३५
१००००- विराट कोहली, सामने- १९२
९७४७- कुमार संगकारा, सामने- २४३
७७७४- जॅक कॅलिस, सामने- २०४
५४२१- केन विलीयमसन, सामने- ११९
वनडेत एकाच क्रमांकावर १०,००० धावा करताना सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये एकाच क्रमांकावर १०,००० धावा बनविताना सर्वाधिक शतके ठोकण्याचा मान देखील विराटकडे जातो. त्याने आत्तापर्यंत ३६ शतके झळकावली आहेत. त्यापाठोपाठ, सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. त्याने ३५ शतके आपल्या नावे केली होती. या यादीत तिसऱ्या स्थानी रिकी पॉंटिंगने वनडेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २५ शतके झळकावली आहेत.
वनडेत एकाच क्रमांकावर १० हजार धावा करताना त्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
३६ शतकं- विराट कोहली, तिसऱ्या क्रमांकावर
३५ शतकं- सचिन तेंडूलकर, दुसऱ्या क्रमांकावर
२४ शतकं- रिकी पॉटींग, तिसऱ्या क्रमांकावर
एकाच क्रमांकावर सर्वात जलद १० हजार धावा
विराटने तिसऱ्या क्रमांकावर १० हजार धावा १९० डावात पूर्ण केल्या. त्यामुळे तो वनडेत एकाच क्रमांकावर सर्वात जलद १० हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने २११ डावा दुसऱ्या क्रमांकावर खेळताना १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
वनडेत एकाच क्रमांकावर १० हजार धावा करताना कमी डाव खेळणारे फलंदाज
१९० डाव- विराट कोहली, तिसऱ्या क्रमांकावर
२११ डाव- सचिन तेंडूलकर, दुसऱ्या क्रमांकावर
२५३ डाव- रिकी पॉटींग, तिसऱ्या क्रमांकावर
विराट-राहुलने सांभाळला भारताचा डाव
इंग्लंडने नाणेफेक जिंकली नंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शिखर धवन आणि रोहित शर्मा ३४ धावांमध्ये तंबूत परतल्यानंतर, कर्णधार विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा सावरला. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. मात्र विराट ६६ धावांवर बाद झाला. विराट आणि केएल राहुल यांच्यात १२१ धावांची भागीदारी झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यात विराटचाच डंका! ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू; केएल राहुलही खास यादीत सामील
अविश्वसनीय!! ट्रेंट बोल्टने डाइव्ह मारत टिपला भन्नाट झेल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल