वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा आता आपल्या अखेरीकडे चालला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपली जागा बनवलीये. असे असतानाच भारतीय संघाचा उपकर्णधार व प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा संघात स्थान दिले गेले आहे. मात्र, त्याच्या निवडीवर अनेकांनी आता निराशा व्यक्त केली.
हार्दिक या विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धच्या चौथ्या सामन्यात गोलंदाजी करताना जखमी झाला होता. तो या दुखापतीतून उपांत्य फेरीपर्यंत सावरेल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, आता तो उर्वरित विश्वचषकात खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हार्दिक संघातून बाहेर झाल्यामुळे युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संधी देण्यात आली. एका अष्टपैलू खेळाडूच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले,
I think Deepak chahar is better replacement for Hardik pandya as per team requirements now.
So playing 11 will be Rohit,Gill,Virat,Iyer, Rahul, Surya, jadeja, Deepak, bumrah, Shami and Kuldeep. So we can proper 5 Bowler with 8 batters and if required iyer & Virat will bowl 2 over— Akash (@im_akashkm) November 4, 2023
‘चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा दीपक चहर संघात हवा होता.’ अनेकांनी त्यालाच योग्य पर्याय म्हणून पसंती दिली आहे
Rohit Sharma and Indian cricket fans waking up to news of Hardik Pandya out of World Cup with Prasidh Krishna replacing him!#HardikPandya pic.twitter.com/yiPRHYcIoi
— Vishal Verma (@VishalVerma_9) November 4, 2023
तसेच काहींनी संघाच्या या निवडीवर मजेदार प्रतिक्रिया देताना मीम शेअर केले.
दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा याने आशिया चषकात शानदार कामगिरी केली होती. मात्र, तो विश्वचषक संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या आतापर्यंतच्या वनडे कारखान्याचा विचार केल्यास त्याने सामने खेळताना बळी मिळवले आहेत. तो सातत्याने 145 च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच त्याच्या उंचीमुळे त्याला अतिरिक्त उसळी देखील मिळते.
(Fans Reacted After Prasidh Krishna Inclusion In ODI World Cup Sqaud)
महत्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका सामन्यात फिक्सिंग? बोर्डाने उचलले गंभीर पाऊल, वाचा सविस्तर
BIG BREAKING: टीम इंडियाचा हुकमी एक्का वर्ल्डकपमधून बाहेर, ‘या’ खेळाडूची संघात एंट्री