चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच यष्टीचित करण्यापासून ते झेल टिपण्यापर्यंत कुठलाही भारतीय यष्टीरक्षक त्याच्या जवळपास सुद्धा नाहीये. परंतु सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात असा काही प्रकार घडला ज्याने, क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
बुधवारी (२८ एप्रिल )सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची जोडी मैदानात आली होती. तर गोलंदाजी करण्याची जबाबदारी दीपक चाहरला देण्यात आली होती.
याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर, चाहरने लेग साईडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर बेअरस्टोने फाइन लेगच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चेंडू, मागे उभा असलेल्या धोनीच्या ग्लोज मध्ये गेला होता. तो चेंडू धोनीच्या ग्लोजला लागून खाली पडला होता. हे पाहून दीपक चाहर देखील हसू लागला होता. तसेच चाहत्यांना हे पाहून आश्चर्य वाटले.
https://twitter.com/SujalBhandari01/status/1387408482370932740?s=08
हे पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे खूप कमी वेळेस पाहायला मिळाले आहे की, धोनी झेल सोडत आहे किंवा धोनी स्टम्पिंग सोडत आहे. एका युजरने लॉजिकल वाक्यरचना करत लिहिले होते की, “महेंद्र सिंग धोनीने झेल सोडण्यात आणि यष्टीरक्षकाने झेल सोडण्यात खूप फरक आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “धोनीला झेल सोडताना पाहण माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षण आहे.” तसेच एका युजरने लिहिले की, “धोनीने इतका सोपा झेल सोडला म्हणजे या वर्षी काहीही होऊ शकते.”
महत्वाच्या बातम्या:
राजस्थानचे रॉयल्स भिडणार मुंबईच्या पलटणला! पाहा कशी असेल आजच्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतला हा मोठा निर्णय
आनंदाची बातमी! धोनीच्या आई-वडिलांची कोरोनाच्या विळख्यातून सुटका, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज






