आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले गेले होते. पण, बुधवारी( १३ ऑक्टोबर) या स्पर्धेसाठीचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठा बदल करण्यात आले आहे. दरम्यान, युझवेंद्र चहलकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. ज्यामुळे नेटकरी भलतेच नाखुश झाले आहेत.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम संघाची बुधवारी (१३ ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली होती. या संघात सर्वात मोठा बदल म्हणजे शार्दुल ठाकूरला अंतिम १५ खेळाडूंमध्ये सहभागी करण्यात आले. तर अक्षर पटेलला मुख्य संघातून बाहेर करून राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
अनेक दिग्गजांना असेही वाटले होते की, युझवेंद्र चहलला या संघात स्थान दिले जाऊ शकते. कारण त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. परंतु, असे काहीच झाले नाही.
युझवेंद्र चहलने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत एकूण १८ गडी बाद केले आहेत. तसेच सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ६ व्या स्थानी आहे. भारतात झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु, यूएईमध्ये त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
युझवेंद्र चहलला संघात स्थान न मिळाल्याने चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच निवड समितीला जाब विचारायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, “चहलने स्वतःला यूएईमध्ये सिद्ध आहे.त्याने १८ गडी बाद केले आहेत. तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. तरी देखील त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले नाही, हे किती योग्य आहे?”
https://twitter.com/_shantanu_RG/status/1448253467366023169
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “चहलने आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.तो भारताचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे. तरीदेखील त्याला दुर्लक्ष करण्याचे कारण काय?”
तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल सारख्या सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने दुर्लक्ष करणे चांगले संकेत नाहीये. आशा करतो की, बीसीसीआय याबाबत नक्की विचार करेल.”
Ignoring players like chahal and siraj who can turn matches into the favour may not be the good sign. Hoping that @BCCI will reconsider this👀.#BCCI #IndianCricketTeam #chahal #Siraj https://t.co/MvriqvDZOf
— Abhilash (@iamabhiii29) October 13, 2021
Feel for Chahal who was outstanding in the IPL. A frontline bowler who could not get into an IPL team plays ahead of Chahal. #chahal #BCCI https://t.co/BZAegqkLKD
— Thriyambhakesh Ravi (@madrasi_19) October 13, 2021
#BCCI official destroying another
talented leg spinner.#chahal#BCCI— Mr.groot406 (@BunnyYa43207052) October 13, 2021
Feel for #Chahal , did so well in both the seasons in UAE (2020 and 2021) still not even in reserves.
What crime has he done @BCCI ?— Aman (@CaptainKohli___) October 13, 2021
#chahal this BCCI selecters took Wrong decision on u man.#chahal#chahal pic.twitter.com/CBUQR5nTWT
— Mr.groot406 (@BunnyYa43207052) October 13, 2021
Every newcomer who performed well in the 2nd leg of IPL is somehow being included in the #T20WCSquad but #Chahal is still not being considered. pic.twitter.com/HChtvEUqSJ
— Aman (@CaptainKohli___) October 13, 2021
Dear @BCCI
We Badly want CHAHAL .#BCCI #chahal
— Mr.groot406 (@BunnyYa43207052) October 13, 2021
Exclusion of #axarpatel was the easiest to add #Shardulthakur…. But no #chahal in the squad.. Shocking #T20WorldCup
— Aman Gupta (@AmanGup20132380) October 13, 2021
https://twitter.com/Lareshh_18/status/1448267628603056129
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा! टी२० विश्वचषकाआधी केन विलियम्सनच्या दुखापतीबाबत दिली अपडेट
तेरा यार हूं मै! अय्यर-आवेशचे बंधूप्रेम; फोटो होतोय व्हायरल
विश्वचषक की आयपीएल फायनल? केकेआरच्या ‘या’ दिग्गज खेळाडूच्या खेळण्याबाबत बोर्ड घेणार निर्णय