टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाला ३-० पराभूत केल्यानंतर, आता या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील सुरवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. दरम्यान आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने तुफानी शतक झळकावले आहे. या खेळी नंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील चाहते ट्विट करून आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.
पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरचे शतक
पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता.ज्यामुळे तो या संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याऐवजी श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी शतक झळकावले. त्याने १५७ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने शतक पूर्ण केले होते.त्यानंतर तो १०५ धावा करत माघारी परतला.
श्रेयस अय्यरचे शतक आणि चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
काही दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक “पाच रुपये की पेप्सी अय्यर भाई सेक्सी…” असे म्हणताना दिसून आले होते. आता शतकी खेळीनंतर देखील कानपूरमध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक “पाच रुपये की पेप्सी अय्यर भाई सेक्सी…” असे बोलताना दिसून आले आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील चाहते आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, “मी स्पष्टपणे ऐकू शकतो की,कानपूरचे प्रेक्षक पाच रुपये की पेप्सी अय्यर भाई सेक्सी…”असे म्हणत आहेत.
https://twitter.com/TweetsByArnav/status/1463810970426306560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463810970426306560%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fshreyas-iyer-kanpur-test-social-media%2F
Shreyas Iyer an amazing talent.
5⃣0⃣ on Test debut.
Well played 🙌#INDvsNZTestSeries— Ibn Ahmed 🇵🇸 (@mahimaniaaaa) November 25, 2021
https://twitter.com/thedpkgodhan/status/1463810640372457472?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463810640372457472%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fshreyas-iyer-kanpur-test-social-media%2F
"5 rupee ki pepsi ,Iyer bhai sexy "
Typical Kanpur crowd 😭— Vijay (@Onehandedsix) November 25, 2021
https://twitter.com/Naammek20899116/status/1463810271726604292?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463810271726604292%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fshreyas-iyer-kanpur-test-social-media%2F
https://twitter.com/Maxithebigshow/status/1463819923658997770?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463819923658997770%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fshreyas-iyer-kanpur-test-social-media%2F
भारतीय संघ मजबूत स्थितीत
न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांनी या सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली आहे. भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ५२ आणि रवींद्र जडेजाने ५० धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ३४५ धावांवर सर्वबाद झाला.