---Advertisement---

“रिमेंबर द नेम, रिषभ पंत”, शतकी खेळीनंतर चाहते भलतेच खुश, दिल्या अशा प्रतिक्रीया

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 12:45 PM
Rishabh Pant
---Advertisement---

केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India)  या दोन्ही संघांमध्ये निर्णायक कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात (Sa vs Ind 3rd test)  दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी आहे. या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. दरम्यान दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या रिषभ पंत याचे (Rishabh Pant) सोशल मीडियावर भरपूर कौतुक केले जात आहे.

या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यात रिषभ पंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तो अनेकदा खराब शॉट खेळून बाद झाला होता. परंतु, यावेळी भारतीय संघातील इतर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले असताना त्याने एकतर्फी झुंज दिली. त्याने टीकाकारांना जोरदार उत्तर देत नाबाद १०० धावांची खेळी केली. या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.

त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला १९८ धावा करण्यात यश आले. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
रिषभ पंतची एकाकी झुंज पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. एका युजरने ट्विट करत लिहिले की, “मला तर वाटतं की, रिषभ पंत जानेवारी महिन्यात काहीतरी टॉनिक घेतो. कारण याच महिन्यात त्याने गॅबा येथे अप्रतिम खेळी केली होती. आता याच महिन्यात महत्वपूर्ण शतक झळकावलं आहे.”

दुसऱ्या युजरने लिहिले की, “झुंड मे तो सुअर आते हे शेर अकेला ही काफी है”. तसेच आणखी एका युजरने ट्वीट करत सुपरमॅन आणि रिषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले की, “तुमचा सुपरहिरो निवडा. माझ्यासाठी तर तो रिषभ पंत आहे.”

https://twitter.com/Spellbounded17/status/1481615249296211974?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1481615249296211974%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Find-vs-sa-rishabh-pant-century-social-media%2F

https://twitter.com/Suleman_71/status/1481618937737617411?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1481618937737617411%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Find-vs-sa-rishabh-pant-century-social-media%2F

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या होत्या. यासह दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

धोनी नाही, ना संगकारा ना इतर कुणी; विक्रमाच्या ‘या’ खास यादीत केवळ पंत आणि गिलख्रिस्ट

जिथे कॅमेरा पोहोचेना तिथे पोहोचला पंतचा षटकार आणि सुरु झाली चेंडूची शोधाशोध; पाहा व्हिडिओ

हे नक्की पाहा :

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---