Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिथे कॅमेरा पोहोचेना तिथे पोहोचला पंतचा षटकार आणि सुरु झाली चेंडूची शोधाशोध; पाहा व्हिडिओ

January 13, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरत आहे. या सामन्यात देखील असेच चित्र पाहायला मिळाले आणि फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) याने तुफानी शतक केले. यादरम्यान त्याने एक चेंडू असा मारला, जे मैदानाबाहेर गेल्यानंतर सापडलाच नाही.

रिषभ पंतने सामन्याच्या दुसऱ्या डावातील ४८ व्या षटकात हा षटकार मारला. या षटकात दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (keshav maharaj) गोलंदाजीसाठी आला होता. महाराजच्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवर पंतने सलग दोन अप्रतिम षटकार ठोकले. यापैकी दुसरा षटकार त्याने खेळपट्टीच्या समोरच्या दिशेने मारला. हा चेंडू एवढा लांब गेला की, शोधाशोध करूनही सापडला नाही. षटकातील या दुसऱ्या षटकारानंतर भारताची धावसंख्या १४८ झाली होती आणि त्यावेळी संघाने चार विकेट्स गमावल्या होत्या. महाराजने या षटकात एकूण १५ धावा खर्च केल्या. पंतने मारलेला हा षटकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

pic.twitter.com/HSpRHJ6ogE

— Cric Zoom (@cric_zoom) January 13, 2022

रिषभ पंत दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने दुसऱ्या डावात स्वतःचे शतक पूर्ण केले. दुसऱ्या डावात त्याने १३९ चेंडूचा सामना केला आणि यामध्ये १०० धावांची खेळी करून नाबाद राहिला. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. पंतव्यतिरिक्त कर्णधार विराट कोहली २९ धावांसह भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या डावात भारत २२३, तर दक्षिण अफ्रिका संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघ पहिल्या डावात १३ धावांनी आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावात पंतच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघ कसाबसा १९८ धावांपर्यंत पोहोचू शकला. दक्षिण अफ्रिका संघाला विजयासाठी शेवटच्या डावात २१२ धावांचे आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या डावात दोन विकेट्सच्या नुकसानावर १०१ धावा केल्या आहेत आणि विजयासाठी त्यांना अजून १११ धावांची आवश्यकता आहे.

महत्वाच्या बातम्या –

रिषभच्या शतकाने भारावला भारतीय दिग्गज; एक नव्हे दोन ट्विट करत केले कौतुक

Video: कसाही फेका चेंडू, बॅटनेच उत्तर देणार! जेन्सनच्या स्लेजिंगला पंतचे ताबडतोब उत्तर

Video: कसाही फेका चेंडू, बॅटनेच उत्तर देणार! जेन्सनच्या स्लेजिंगला पंतचे ताबडतोब उत्तर

व्हिडिओ पाहा –


Next Post
Photo Courtesy: Twitter/IndSuperLeague

चेन्नईयनने हैदराबादला बरोबरीत रोखले

capetown rishabh 100

धोनी नाही, ना संगकारा ना इतर कुणी; विक्रमाच्या 'या' खास यादीत केवळ पंत आणि गिलख्रिस्ट

M SHAMI

शमीने 'त्या' आफ्रिकन फलंदाजाला बनविले 'बकरा'; मालिकेत दिली नाही स्थिरावण्याची संधी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143