---Advertisement---

रिषभच्या शतकाने भारावला भारतीय दिग्गज; एक नव्हे दोन ट्विट करत केले कौतुक

capetown rishabh 100
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्याती कसोटी मालिकेचा (sa vs ind test series) तिसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. उभय संघातील या तिसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसापासून गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय वेगवान गोलंदाजांनी देखील तुफान प्रदर्शन केले. पहिल्या डावात माफक आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत गेला. परंतु, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती कौतुकस्पद होती. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra sehwag) याने पंतचे कौतुक करण्यासाठी क्षणाचाही विलंब केला नाही.

रिषभ पंतची मैदानावर फटकेबाजी सुरूच होती, अशात माजी दिग्गज विरेंद्र सेहवागने त्याचे ट्वीटरव कौतुक करायला सुरुवात देखील केली. पंत या कसोटी सामन्यात अगदी एकदिवसीय सामन्यासारखी फलंदाजी करत होता. यादरम्यान त्याने मारलेले अनेक मोठे शॉट पाहायला मिळाले. त्याची ही फलंदाजी पाहून सेहवागने पंतला जगातिक कसोटी क्रिकेटमधील मानाचे स्थान दिले आहे. आपल्या खेळी दरम्यान पंतने मारलेला एक चेंडू बराच वेळ सापडत नव्हता. त्यावेळी, सेहवागने एक ट्वीट केले.

https://twitter.com/cric_zoom/status/1481620706215743488?s=19

सेहवागने ट्वीटमध्ये लिहिले की, “या पोराला मोकळच सोडा. जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या सामना जिंकवून देणाऱ्यांपैकी एक. #रिषभ पंत.” असे ट्वीट केले आहे. चाहत्यांना देखील सेहवागने पंतचे कौतुक केल्यानंतर आनंद झाला आहे. तसेच पंतने शतक साजरे केल्यावरही सेहवाग त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

दरम्यान, या सामन्याचा विचार केला तर, भारतीय संघाने पहिल्या डावात १३ धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात भारतीय संघ २२३ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर फलंदाजीला आलेला दक्षिण अफ्रिका संघ देखील अवघ्या २१० धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आल्यानंतर सलामीवीर स्वस्तात बाद झाले.

केएल राहुल आणि मयंक अगरवाल या भारतीय सलामीवीरांनी अवघ्या २४ धावांवर स्वतःची विकेट मगावली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसह कोणताच फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. परंतु रिषभ पंत मात्र खेळपट्टीवर चांगले प्रदर्शन करत राहिला. पंतने १३३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकाराच्या मदतीने त्याच्या १०० धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या डावात पंतने एकापेक्षा एक सुरेख शॉट चाहत्यांना पाहायला मिळाले. यामध्ये त्याने मारलेला एक षटकार एवढा मोठा होता की, चेंडू शोधूनही सापडला नाही.

महत्वाच्या बातम्या –

अहमदाबाद की लखनऊ? कोणत्या संघात खेळणार राशिद?

केपटाऊन कसोटीतही रहाणेचा फ्लॉप शो सुरूच! रबाडाच्या चेंडूवर असा झाला बाद, पाहा व्हिडिओ

“हॅपी रिटायरमेंट” म्हणत नेटकऱ्यांनी रहाणे-पुजाराला सोशल मीडियावर दिला निरोप, पाहा भन्नाट मिम्स

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---