---Advertisement---

इंग्लंडचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू ‘या’ अटीवर नोंदवणार आयपीएलसाठी नाव

eng 2016
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) विषयी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आयपीएलचा रोमांच वाढवणाऱ्या बातम्या एकापाठोपाठ समोर येत आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी जागतिक क्रिकेटमधील काही महान खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेण्याविषयी संकेत दिले आहेत. या यादीत इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट (joe root) देखील सहभागी झाला आहे. रुटने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अजून याविषयी त्याने अखेरचा निर्णय घेतलेला नाही.

आयपीएलच्या पुढच्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये आयपीएल मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. एका प्रमुख वृत्तसंस्थेने जो रुटच्या हवाल्याने सांगितले की, “जर मला (जो रुट) वाटले की, यामुळे माझ्या कसोटी कारकिर्दीला कसलेच नुकसान होणार नाही, तर मी लिलावात माझे नाव देईल. परंतु मी असे कोणतेच काम करणार नाही. जे माझ्या इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यामध्ये अडथळा ठरेल.”

जो रुटने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने देखील आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याचे संकेत दिले होते. परंतु, स्टार्कही रुटप्रमाणेच आयपीएलमध्ये खेळण्याविषयी विचार करत आहे. यापूर्वी स्टार्कने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी २७ आयपीएल सामने खेळले आहेत. तसेच २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला मोठ्या किमतीत विकत घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो या हंगामात खेळू शकला नव्हता.

जो रुट कसोटी क्रिकेटमधील एक महान फलंदाज आहे. मात्र, टी२० मध्ये तो जास्त खेळला नाही. त्याने इंग्लंडचे ३२ टी२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ८९३ धावा स्वतःच्या खात्यावर नोंदवल्या. यामध्ये त्याचे पाच अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या टी२० मध्ये सर्वाधिक ९० धावांच्या खेळीचा समावेश आहे. रुटच्या नेतृत्वातील इंग्लंडचा कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलियासोबत ऍशेस मालिका खेळत आहे. मालिकेत इंग्लंडने पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करला आहे आणि ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अशात जर रुट आयपीएलच्या मेगा लिलावात  समील झाला, तर त्याच्यावर किती बोली लागते, ही गोष्ट पाहण्यासारखी असेल.

महत्वाच्या बातम्या –

कोण आहे हा युवा वादळी फलंदाज? ज्याच्यामागे धावतायेत चार-चार आयपीएल संघ

SAvsIND, 3rd Test, Live: पंतचे शानदार अर्धशतक, तर विराटच्या संयमी खेळीने सावरला डाव; लंचब्रेकपर्यंत भारताकडे १४३ धावांची आघाडी

दक्षिण आफ्रिकेचा सुपरमॅन! किगन पीटरसनने हवेत झेपावत घेतला पुजाराचा भन्नाट एकहाती झेल

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---