केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात न्यूलँड्स येथे कसोटी मालिकेतील अखेरचा सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांत विजयासाठी चूरस पाहायला मिळाली. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या किगन पीटरसन याने (Keegan Petersen) घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला होता.
तिसऱ्या दिवशी भारताकडून दुसऱ्या डावात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. पण, डावाच्या १८ व्या षटाकातील आणि तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर पुजाराला मार्को यान्सिनने बाद केले. पुजाराचा भन्नाट झेल किगन पीटरसनने घेतला.
झाले असे की, यान्सिनने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला होता. यावेळी चेंडूला उसळी मिळाली आणि तो चेंडू पुजाराच्या बॅट लागत मागे गेला. याचवेळी लेग स्लीपला उभा असलेल्या किगन पीटरसनने उजवीकडे झेप घेत एका हाताने झेल घेतला. त्यामुळे पुजाराला ९ धावांवर माघारी परतावे लागले. पीटरसनने घेतलेला झेल पाहून सर्वचजण चकीत झाले होते. त्याच्या क्षेत्ररक्षणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. तसेच त्याच्या झेलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Keegan Petersen with a magnificent catch on the second ball of the day???? #SAvIND #FreedomTestSeries #BePartOfIt | @Betway_India pic.twitter.com/zqcAtMahSi
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 13, 2022
पीटरसनची फलंदाजीतही कमाल
या सामन्यात पीटरसनने दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात ७२ धावांची एकाकी झुंज दिली होती. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला होता. त्याच्याव्यतिरिक्त अन्य दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २१० धावा केल्या होत्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
अधिक वाचा – Virat Kohli PC | पुजारा आणि रहाणेच्या प्रश्नावर विराटचे रोखठोक आणि सडेतोड उत्तर, पाहा काय म्हटला कोहली
तत्पूर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २२३ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने ७९ धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच चेतेश्वर पुजाराने ४३ धावांचे योगदान दिले. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
या कसोटी मालिकेतील सेंच्यूरियनला झालेला पहिला सामना भारताने जिंकला होता, तर जोहान्सबर्गला झालेला दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे केपटाऊन कसोटी निर्णायक होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ स्पर्धेपूर्वी ‘या’ दोन संघांचा मोठा पराक्रम! लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप-१० मध्ये स्थान
केव्हा, कुठे आणि कधी रंगणार आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार! घ्या जाणून एकाच क्लिकवर