टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पाडला. ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर आता न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची टी-२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी या मालिकेसाठी भारतीय चाहते खूपच उत्साहीत दिसत आहेत. दरम्यान, रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे तिकिट विकत घेण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेची सुरुवात १७ नोव्हेंबरपासून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना १९ नोव्हेंबरला झारखंडची राजधानी आणि कॅप्टनकूल एमएस धोनीचे शहर रांचीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेले पोहोचल्याचे दिसत आहे. या सामन्यासाठी तिकिट विक्री सुरू झाली असून चाहत्यांनी जेएससीए स्टेडियमच्या बाहेर तिकिट मिळवण्यासाठी गर्दी केली आहे. ही गर्दी पाहून याठिकाणी होणाऱ्या सामन्याविषयी चाहत्यांच्या उत्सुकतेचा अंदाजा येऊ शकतो.
झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनकडून या सामन्याची तिकिटविक्री करण्यासाठी तीन काउंटर खोलले आहेत. स्टेडियमच्या पश्चिम दिशेला असलेल्या गेटवर हे तीन काउंटर असून त्याठिकाणी तिकिट घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत चाहते जमा झाले आहेत. चाहत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी बांबू लावण्यात आले आहेत. यामध्ये काही चाहते असेही आहेत ज्यांनी तिकिट घेण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच उपस्थिती लावली होती आणि रात्रभर ते रांगेत उभे राहिले आहेत. अशात ज्या चाहत्यांना तिकिट मिळत आहे, त्यांना जग जिंकल्याचा अनुभव येत असावा.
The countdown has begun! Fans throng @cricketjsca to get tickets for the #IndiaVsNewZealand tie on 19th Nov. #ind #TeamIndia @BCCI @ImRo45 #Ranchi #Cricket pic.twitter.com/QqPxQKE1wS
— KunalSarangi (Modi Ka Parivar) (@KunalSarangi) November 15, 2021
दरम्यान, या सामन्याचे तिकिट रांगेत घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असून काही चाहते सोपा मार्ग निवडत आहेत. स्टेडियमच्या बाहेर काही ठिकाणी तिकिट काळाबाजार होत आहे. अशात अनेक चाहत दुप्पट मोबदला देऊन तिकिट विकत घेण्यासाठीही तयार होत आहेत. तर दुसरीकडे जे चाहते रांगेत उभे आहेत त्यांच्यात मात्र या गैरप्रकारमुळे नाराज दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! आयसीसीने बीसीसीआयवर सोपवल्या ३ स्पर्धांच्या जबाबदाऱ्या, वाचा सविस्तर
टी२० विश्वचषक संपताच पाकिस्तानच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटला अलविदा