आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने संघातील कोविड उद्रेकाच्या भीतीने त्यांच्या आगामी सामन्यासाठी पुण्याचा सोमवारचा (१८ एप्रिल) नियोजित प्रवास रद्द केला आहे. दिल्लीचा आगामी सामना पंजाब किंग्जविरुद्ध २० एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. ही चिंताजनक बातमी पुढे आल्यानंतर आयपीएल चाहत्यांनी सोशल मीडियावर कँसल आयपीएल म्हणजे आयपीएल रद्द करा अशी मागणी केली जात आहे.
सोमवारी (१८ एप्रिल) अशी बातमी आली की, दिल्लीने (Delhi Capitals) संघातील कोविड उद्रेकाच्या भीतीने (Covid-19) त्यांच्या आगामी सामन्यासाठी पुण्याचा सोमवारचा नियोजित प्रवास रद्द केला आहे. सोमवार आणि मंगळवार रोजी नियोजित केलेल्या कोविड-१९ चाचण्यांसह दिल्लीच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आता संघातील एका खेळाडूचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजत आहे. तो खेळाडू मिशेल मार्श असल्याचे म्हटले जात आहे. अशात आयपीएलच्या पंधराव्या हंगामावर कोरोनाचे संकट ओढावल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर आयपीएल रद्द करा (Cancel IPL), असा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
याबरोबरच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघांनाही ट्रोल केले जात आहे. या संघांना चालू हंगामात अपेक्षित यश येताना दिसत नाहीये. चेन्नईने आतापर्यंत ६ पैकी ५ तर मुंबईने ६ पैकी ६ सामने गमावले आहेत. म्हणून आयपीएल रद्द होणार असल्याने या संघांवरही भरपूर मीम्स बनत आहेत.
येथे पाहा मीम्स-
Cancel IPL – trending
Meanwhile #Mi and #CSK Fans : pic.twitter.com/1JkMst0CMZ
— KNP (@KNP_333) April 18, 2022
Let's Go With Cancel IPL 😌😌 pic.twitter.com/nYROmK3CU5
— 마륵 타망 ⚡⚡ (@_Marktamang) April 18, 2022
GT and LSG fans started protest after Cancel IPL starts trending on twitter 😂 pic.twitter.com/fumNZemhc6
— Bandhu Agrawal (@bandhu_agrawal) April 18, 2022
Cancel IPL is trending..
This time not me….,🙏🏿 pic.twitter.com/5tgbf8sFnb
— kiran ◡̈⃝💜🔔 (@urstruly__kiran) April 18, 2022
Watching cancel IPL is trending pic.twitter.com/b7y0zBKF3O
— ⚡R D 📖 (@therdmeme) April 18, 2022
https://twitter.com/MAHREENKHAN786/status/1515965845360373761?s=20&t=N-uBLCf8AMo1AGvzZK8VWg
Cancel ipl pic.twitter.com/3K3WIAq9HP
— They call Him #Usthaad (@SanjuJsp) April 18, 2022
Cancel IPL is trending meanwhile RCB fans for the first time watching RCB play well for the first time pic.twitter.com/4cBXScxity
— Pragati Singh (@bts__chingu) April 18, 2022
Cancel ipl is trending
Meanwhile CSK and mi fans pic.twitter.com/PrCgMOdlfn— Gourav Joshi (@Iam_Gouravjoshi) April 18, 2022
https://twitter.com/kumar500rohit/status/1515963447036776451?s=20&t=6micJwx2EvXXBTM8OadxOQ
दरम्यान गेल्या २ हंगामांपासून आयपीएलला कोविड-१९ चा दणका सहन करावा लागला आहे. २०२० मध्ये जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे हा संपूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर आयपीएल २०२१ मधील पहिला टप्पा भारतात तर दुसरा टप्पा युएईत झाला होता. अशात आता आयपीएल २०२२ चे २९ सामने झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण साप़डू लागल्याने या हंगाम स्थगित होईल की नाही, हे पाहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अपयशी विजय शंकर होतोय जोरदार ट्रोल; मीम्स पाहून रोखणार नाही हसू
IPL2022| राजस्थान वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट