---Advertisement---

‘तो पनवती आहे’, विराटची प्रशंसा केल्याने माजी भारतीय कर्णधाराला चाहत्यांनी धरले धारेवर

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 3:13 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर गौतम गंभीर सोशल मीडियावर तसेच क्रिकेट संकेतस्थळांवर क्रिकेटविषयक आपली मते मांडत असतो. अनेकदा चाहते त्याच्या मताशी सहमत असतात. त्याने, नुकतेच विराट कोहलीचे वनडे क्रिकेटमध्ये १२,००० धावा केल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्याच्या या कृतीवर अनेक चाहते नाराज झाले. त्यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

विराटचे केले होते अभिनंदन

भारताचा एक यशस्वी सलामीवीर राहिलेल्या गंभीरने विराटचे अभिनंदन करताना म्हटले होते की, ‘विराटने जे काही मिळवले त्यासाठी त्याचे अभिनंदन. २०,००० आंतरराष्ट्रीय धावा व ७० हून अधिक शतके या सर्वांमुळे तो आज महान बनला आहे’

चाहत्यांनी केले ट्रोल

गंभीरने विराटचे अभिनंदन केल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करताना लिहले, ‘गंभीरला माहीत झाले आहे की, तो बोलतो त्याच्या कायम उलट होते. पनवती आहे तो. त्यामुळे तो विराटबद्दल चांगले बोलत आहे. जेणेकरून विराटची कामगिरी खराब होईल. मात्र, यावेळी त्याचे डावपेच चालणार नाहीत.’

अन्य एका युजरने ट्वीट करत लिहिले, ‘आज कोहलीचा मास्टरक्लास हवा होता. पण, या पनवतीमुळे साऱ्या अपेक्षा धुळीस मिळाल्या.’

अजून एका चाहत्याने गंभीरच्या ट्विटखाली उत्तर देताना लिहिले, ‘विराटच्या चाहत्यांनो नाराज होऊ नका, इथून पुढे आपण प्रत्येक सामन्यावेळी याची पनवती लागू नये म्हणून प्रार्थना करू.’

गंभीरच्या विधानांचा होतोय उलटा परिणाम

मागील काही दिवसांपासून गंभीरच्या विधानांचा उलटा परिणाम होत आहे. आयपीएलदरम्यान त्याने ज्या-ज्या खेळाडूंचे कौतुक केले, त्या-त्या खेळाडूंची कामगिरी ढासळली होती. आयपीएलच्या सुरुवातीलाच जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या संजू सॅमसनने गौतम गंभीरच्या कौतुकानंतर सर्वांना निराश केले होते. तसेच, आयपीएलच्या अंतिम सामन्यात फॅन्टसी लीगमध्ये त्याने कर्णधार बनवलेल्या मार्कस स्टॉयनिसला भोपळाही फोडता आला नव्हता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शतक झळकवणारा स्टीव स्मिथ गंभीरच्या कौतुकानंतर तिसऱ्या सामन्यात अवघ्या ६ धावा काढून परतला.

महत्त्वाच्या बातम्या-

एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट

“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”

मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

ट्रेंडिंग लेख –

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---