भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर झालेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने अशी काही विधाने केली आहेत, त्यामुळे त्याचे काही ठिकाणी कौतुक होते तर काही जण त्याला ट्रोल करत आहेत. याच मुलाखतीतील एका वक्तव्यामुळे आता तो चांगलाच चाहत्यांच्या तावडीत सापडला आहे.
काही दिवसांनी संपन्न झालेल्या आयपीएल दरम्यान भारतीय संघाचे माजी सलामीवीर सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग हे एका इलायची ब्रँडची जाहिरात करताना दिसून आले होते. विशेष म्हणजे तो ब्रँड पान मसाला देखील बनवतो. यावरूनच गंभीरने या दोघांवर टीका केली होती. गंभीर म्हणालेला,
“लोक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतात. पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही अशा जाहिराती करायला नाही पाहिजे. मला अशा ऑफर आल्या होत्या मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला.”
त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचे अनेकजण कौतुक करत होते. मात्र, काहींनी त्याने भूतकाळात केलेल्या अशाच जाहिराती आता समोर आणून त्याची पोलखोल केली आहे. गंभीर खेळाडू म्हणून खेळत असताना एका मद्य बनवणाऱ्या ब्रँडची जाहिरात करत असत. तो ब्रँड मिनीरल वॉटर आणि म्युझिक सीड देखील बनवतो. यावरूनच अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.
एका सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लिहिले, ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ तर, दुसऱ्या एकाने लिहिले, ‘रॉयल स्टॅग काय बनवतात हे कदाचित तुला माहीत नव्हते.’
याच मुलाखतीत गंभीरने भारतीय क्रिकेटमध्ये व्यक्तीपूजा होत असल्याने क्रिकेट मागे पडत असल्याचे म्हटले होते. तसेच सर्व खेळाडूंना विजयाचे श्रेय मिळायला हवे असे देखील त्याने मत मांडले.
(Fans Troll Gautam Gambhir On His Statement On Sunil Gavaskar And Virendra Sehwag Pan Masala Advertisement)
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
VIDEO । एका चेंडूत खर्च केल्या 18 धावा, भारतीय गोलंदाजाचा नकोसा विक्रम!