जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटी क्रमवारीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन फलंदाज अव्वल स्थानी पोहोचले आहेत. याआधीही असा अनोखा योगायोग 1984 साली घडला होता. म्हणजेच तब्बल 39 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली.
मार्नस लबुशेन फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आपली जागा कायम ठेवली आहे. तर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड आहे. हेडने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये 163 धावांची शानदार खेळी खेळली होती. तसेच, शेवटच्या वेळी असा अनोखा योगायोग 1984 साली घडला होता जेव्हा डिसेंबर 1984 मध्ये एकाच संघातील 3 फलंदाजांनी कसोटी क्रमवारीत अव्वल 3 मध्ये स्थान पटकावले होते.
एकाच संघातील तिघेही कसोटी क्रमवारीच्या यादित सामील
खरं तर, 1984 मध्ये, वेस्ट इंडिजचे गॉर्डन ग्रीनिज (810), क्लाइव्ह लॉईड (787), आणि लॅरी गोम्स (773) यांनी क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 मध्ये स्थान मिळवले. याशिवाय, ताज्या कसोटी क्रमवारीबद्दल बोलायचे तर, या ऑस्ट्रेलियन 3 फलंदाजांव्यतिरिक्त, उस्मान ख्वाजाचा (Usman Khawaja) देखील टॉप 10 मध्ये समावेश आहे. ख्वाजा कसोटी फलंदाजी क्रमवारीत 9व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच यावेळी 4 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळाले आहे.
A unique stat repeats itself after nearly 39 years in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings ????
More ????https://t.co/7sP4bhf19W
— ICC (@ICC) June 14, 2023
यासोबतच फलंदाजी क्रमवारीत इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर केन विलियमसन (Kane Williamson) चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला. जो मार्ग क्रमांक 6 वर आणि डेरिल मिशेल 7 वर उपस्थित आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने 8 क्रमांकावर आहे. उस्मान ख्वाजा 9व्या तर भारताचा ऋषभ पंत 10व्या क्रमांकावर आहे. पंत हा भारताचा एकमेव फलंदाज आहे जो फलंदाजी कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकला आहे.
शिवाय गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर, आयसीसी क्रमवारीत रविचंद्रन अस्विन पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह मात्र गोलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर घसरला. रविंद्र जडेजा 9 क्रमांवर दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
मस्तच! 5 चेंडूत 5 षटकार ठोकत अलिशान शराफूची रिंकू सिंगला टक्कर, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?