---Advertisement---

विश्वचषक२०१९: संघ पावसामुळे तर आयसीसी नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रियांमुळे हैरान

On: शुक्रवार, जून 14, 2019 1:48 PM
---Advertisement---

गुरुवारी(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे.

2019 विश्वचषकात पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द होणारा एकूण चौथा सामना आहे. याआधी 2019 विश्वचषकात 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामना आणि 11 जूनला  बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघातील सामना पावसामुळे नाणेफकही न होता रद्द झाला आहे.

तसेच 10 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामनाही पावसामुळेच अनिर्णित राहिला होता. पण या सामन्यात केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पुर्ण होऊ शकला नव्हता.

तसेच अनेक सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत असल्याने आणि पुढील काही सामन्यांवरही पावसाचे संकट असल्याने सध्या आयसीसीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

तसेच नेटिझन्सने सोशल मीडियावर या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात चर्चा केलेलीही दिसून आली आहे. त्याचबरोबर आयसीसीला आणि या विश्वचषक स्पर्धेला नेटीझन्सने मजेशीर फोटो एडीट तसेच काही जोक करत ट्रोल केले आहे. तसेच अनेक नेटीझन्सकडून मजेशीर प्रतिक्रीया देखील आल्या आहेत.

नेटीझन्सने आयसीसी आणि 2019 विश्वचषकावर दिलेल्या या काही गमतीशीर प्रतिक्रिया…

#1. सध्या शेतीतील पेरणीला घाई करू नका. इंग्लंडला जास्तच पाऊस पडत आहे.. लवकरच महाराष्ट्रात पाऊस चांगला पडेल तो पर्यंत थांबा…

#2. पावसाळ्यात इथे आपण लग्न ठेवत नाही… आणि यांनी वर्ल्डकप ठेवला आहे….

#3. औरंगाबादकरांनी एक वर्ल्ड कपच्या नावाने प्रतियोगिता आयोजित करावी …पाऊस तरी पडेल

#4. मी काय म्हणतो..त्यो वर्ल्ड कप इतळवा, त्याची रुपै रुपैची नाणी पाडा..आणि द्या प्रत्येकाला येक येक..

#5. आयसीसीला म्हणा एक ट्रॅक्टर सजवा वर वर्ल्डकप ठेवा पुढे DJ लावा सर्व टीमचे खेळाडू नाचवत मिरवणूक काढा अन तो वर्ल्डकप समुद्रात नेऊन बुडवा…

#6. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम पोहण्याचा निर्णय घेतला आहे.

#7. आता 6 वाजता पोहणार की क्रिकेट खेळणार याचे परीक्षण होणार आहे.

#8. विश्वचषक स्पर्धेत पावसामुळे सामने रद्द होत आहेत. त्यामुळे ICC ने पावसालाच ह्यावेळचा विश्वकप विजेता घोषित करावं.

#9. पुन्हा एकदा आज सामना पाऊस जिंकला आणि विश्वचषकाच्या पॉईंट टेबलमध्ये ४ मॅच जिंकून १ नंबरला आला… विश्वचषक विजतेपदाचा प्रबळ दावेदार सध्या पाऊस आहे…

#10. एक मित्र म्हणला की…. इकडं आमच्या मराठवाड्यात वर्ल्डकप ठेवायचा ना… १-पाऊस पडत नाही २- वर्ल्डकप मुळं लाईट राहिली असती ३-हिरवं गवत बघितलं असतं ४- अजून खूप काही झालं असतं

#11. वर्ल्डकप कोण जिंकणार?…. पाऊस!

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–विश्वचषक २०१९: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…

–जाणून घ्या, विश्वचषक इतिहासात एकही चेंडूचा खेळ न होता किती सामने झाले आहेत रद्द

–भारताचे प्रशिक्षक म्हणतात, केएल राहुलने बनावे टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटर सारखे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment