भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज (२६ डिसेंबर) मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९५ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दिवसाची अखेरची ११ षटके खेळायला उतरलेल्या भारतीय संघाने दिवसाखेर १ बाद ३६ धावा केल्या. सलामीला आलेला पदार्पणवीर शुबमन गिल २८ धावांवर नाबाद राहिला असला तरी मयंक अगरवाल मात्र स्वस्तात माघारी परतला. सलग दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरल्याने चाहत्यांनी मयंकला सोशल मिडीयावर ट्रोल केले.
गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवल्यानंतर सलामीवीर दिवसाखेर नाबाद राहून भारताची स्थिती अधिकच मजबूत करतील, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र भारतीय डावाच्या पहिल्याच षटकातील सहाव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मयंकला पायचीत पकडले. त्यामुळे मयंक खातेही न उघडता तंबूत परतला. पहिल्या सामन्यात देखील मयंकने अनुक्रमे १७ आणि ९ अशाच धावा काढल्या होत्या. त्याच्या या खराब कामगिरीमुळे सोशल मिडीयावर त्याची खिल्ली उडविणारे ट्रोल व्हायरल झाले आहेत.
पाहा काही मिम्स:
https://twitter.com/jayu_19/status/1342728612449984513
https://twitter.com/_i_am_s_s/status/1342721626194907137
तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत भारताला पहिल्या दिवसाच्या खेळात आघाडीवर आणले. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक हरली असली तरी त्याचा फारसा फरक पडला नाही. भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबूशेनने सर्वाधिक ४८ धावा काढल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह ४ बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला आर अश्विनने ३ आणि पदार्पणवीर मोहम्मद सिराजने २ बळी घेत सुयोग्य साथ दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ३६ धावा केल्या आहेत. शुबमन गिल २८ तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहेत.
संबधित बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– बापरे! सिराजने जोराने टाकलेला चेंडू आदळला ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या हेल्मेटवर अन्
– त्याची बॅट क्रीजच्या आत आलीच नव्हती, टीम पेनबाबत दिलेल्या चुकीच्या निर्णयावर शेन वॉर्नची प्रतिक्रिया






