---Advertisement---

युपी वॉरियर्झचा धक्कादायक निर्णय! मॅचविनर हॅरिसला बसवले बाकावर‌, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

---Advertisement---

पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या हंगामातील पाचवा सामना युपी वॉरियर्झ व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या या दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, या सामन्यात युपी संघाने पहिल्या सामन्यातील विजयाची शिल्पकार ठरलेल्या ग्रेस हॅरिस हिला बाकावर बसवले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध युपी वॉरियर्झने आपल्या संघात एक बदल केला. ग्रेस हॅरिसच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल हिला संघात स्थान दिले. संघाच्या या रणनीतीवर अनेकांनी टीका केली तसेच आश्चर्य देखील व्यक्त केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना एका वापरकर्त्यांने लिहिले,

 

‘तुम्ही ग्रेस हॅरिसला बाकावर कसे बसू शकता? तिने तुमच्यासाठी मागील सामना जिंकून दिला आहे. संघ व्यवस्थापनाने हा आश्चर्यकारक निर्णय घेतला.’

अन्य एका हँडलवरून लिहिण्यात आले की,

https://twitter.com/GyaaniCricketer/status/1633120631930904578?t=5nGxJnUSpJqRucuuylcC6w&s=19

 

‘आज युपीचा पराभव झाल्यास त्याला पूर्णपणे जबाबदार कर्णधार हिली असेल.’

https://twitter.com/_sidism/status/1633120253495615489?t=aoTLZnzhYrUJBGZVw_J7_A&s=19

 

तर एकाने लिहिले,

‘अनुभवहीन संघ व्यवस्थापन अशा प्रकारचे निर्णय घेते.’

पहिल्या सामन्यात युपीने गुजरातवर एक चेंडू राखून विजय मिळवला होता. विजयासाठी मिळालेल्या 170 धावांचा पाठलाग करताना युपीला अखेरच्या तीन षटकात 53 धावांची गरज होती. त्यावेळी ग्रेस हॅरिसने अक्षरशा वादळी फलंदाजी केली. हॅरिसने अखेरच्या 11 चेंडूंवर 43 धावांचा पाऊस पाडला. तिला सोफी एक्लस्टनने नाबाद 22 धावा करत तिला साथ दिली. अखेरच्या षटकात 19 धावांची गरज असताना हॅरिसने एक चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. तिने नाबाद 59 धावांची खेळी केली. त्यानंतर तिचे जोरदार कौतुक होत होते.

(Fans Troll UP Warriorz Management And Captain After Benched Grace Harris Against Delhi Capitals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---