शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर) क्रिकेटविश्वाला त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या अपघातानंतर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही एक पोस्ट करत आपण प्रार्थना करत असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर ती चाहत्यांच्या चांगलीच निशाण्यवर आली.
रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात 30 डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील रुरकी या त्याच्या गावी जात असताना झाला. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्याला दिल्लीतील खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली. तिने या पोस्टला प्रेयिंग (प्रार्थना) असे कॅप्शन दिले. मात्र, याच पोस्टवर तीने थेट ‘अप्सरा आली’ हे मराठी गाणे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून दिले. याच कारणाने चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
https://www.instagram.com/p/Cmx4FghoI1o/?igshid=YmMyMTA2M2Y=
एका चाहत्याने लिहिले, ‘रिषभचा अपघात झाला हे तुला माहित आहे का?’ तर दुसऱ्या एकाने लिहिले, ‘तू प्रार्थना म्हणून फोटो अपलोड करते आणि हे छायाचित्र पोस्ट करते’ अन्य एका हँडलवरून ‘तू काळी जादू केली ‘असे लिहिण्यात आले.
रिषभ व उर्वशी हे काही वर्षआधी प्रेमात असल्याचे सांगितले जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात सोशल मीडियावर वादही होत होता. त्यामुळे अनेक जण उर्वशीला ट्रोल करत असतात. उर्वशी सातत्याने RP असा उल्लेख करत पोस्ट करत असत. मात्र तिने नंतर हा आरपी दुसरा असल्याचे स्पष्ट केलेले.
(Fans Troll Urvashi Rautela After Rishabh Pant Accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात
Rishabh Pant Car Accident: एका डुलकीने पंतची कारकिर्द धोक्यात! इतके दिवस राहणार क्रिकेटपासून दूर?